advertisement

Krushi Market Rate: सोयाबीनला आला भाव, कांदा आणि मक्याची परिस्थिती काय? सध्याचा भाव किती?

Last Updated:

शनिवार, दिनांक 29 नोव्हेंबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये सोयाबीन, कांदा व मक्याची आवक आणि भाव पाहू.

+
Krushi

Krushi Market

मुंबई: शनिवार, दिनांक 29 नोव्हेंबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये सोयाबीन, कांदा व मक्याची आवक आणि भाव पाहू.
मक्याचे दर: राज्याच्या कृषीमार्केट मध्ये आज एकूण 16 हजार, 191 क्विंटल मक्याची आवक झाली. यापैकी बुलढाणा मार्केटमध्ये 3 हजार 640 क्विंटल सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 1200 ते जास्तीत जास्त 1595 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 2 क्विंटल मक्यास 2500 ते 2700 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
कांद्याची उच्चांकी आवक: राज्याच्या मार्केटमध्ये 1 लाख, 21 हजार 242 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 44 हजार 855 क्विंटल सर्वाधिक आवक अहिल्यानगर बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 200 ते 1585 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच नाशिक मार्केटमध्ये आवक झालेल्या 900 क्विंटल कांद्यास सर्वसाधारण 2450 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
सोयाबीन आवकेत मोठी घट: राज्याच्या मार्केटमध्ये 37 हजार 214 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. यापैकी अकोला मार्केटमध्ये 4 हजार, 695 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3950 ते 4675 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच जालना मार्केटमध्ये आवक झालेल्या 8119 क्विंटल पिवळ्या सोयाबीनला प्रतीनुसार 3750 ते 4988 रुपये प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Krushi Market Rate: सोयाबीनला आला भाव, कांदा आणि मक्याची परिस्थिती काय? सध्याचा भाव किती?
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement