advertisement

Krushi Market Today Rate: सोयाबीनने शेतकऱ्याला हसवलं, पण कांद्याने रडवलं; इतर शेतमालांचे दर काय?

Last Updated:

बुधवार, दिनांक 12 नोव्हेंबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये सोयाबीन, कांदा व मक्याची आवक आणि भाव पाहू.

+
Krushi

Krushi Market

मुंबई: बुधवार, दिनांक 12 नोव्हेंबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये सोयाबीन, कांदा व मक्याची आवक आणि भाव पाहू.
मक्याचे दर गडगडले: राज्याच्या कृषीमार्केट मध्ये आज एकूण 35 हजार 973 क्विंटल मक्याची आवक झाली. यापैकी जळगाव मार्केटमध्ये 11 हजार 132 क्विंटल मक्याची सर्वाधिक आवक झाली. त्यास मक्याच्या प्रतीनुसार कमीत कमी 1140 ते जास्तीत जास्त 1574 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 2 क्विंटल मक्यास 2500 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
कांद्याची उच्चांकी आवक मात्र भाव दबावातच: राज्याच्या मार्केटमध्ये आज 1 लाख, 76 हजार 683 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 92 हजार 537 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 355 ते जास्तीत जास्त 1822 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच सोलापूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 711 क्विंटल कांद्यास 200 ते 3500 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
सोयाबीनची आवक आणि भाव दबावात: राज्याच्या मार्केटमध्ये 99 हजार 093 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. यापैकी लातूर मार्केटमध्ये सर्वाधिक 20 हजार 640 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 4285 ते 4773 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच अकोला मार्केटमध्ये आवक झालेल्या 5439 क्विंटल पिवळ्या सोयाबीनला प्रतीनुसार 4025 ते 5180 प्रमाणे सर्वाधिक सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Krushi Market Today Rate: सोयाबीनने शेतकऱ्याला हसवलं, पण कांद्याने रडवलं; इतर शेतमालांचे दर काय?
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement