advertisement

Krushi Market Rate: कांद्याची आवक वाढली, दर घसरले; सोयाबीनला विक्रमी दर, इतर शेतमालाला भाव किती?

Last Updated:

बुधवार, दिनांक 19 नोव्हेंबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये सोयाबीन, कांदा व मक्याची आवक आणि भाव पाहू.

+
Krushi

Krushi Market

मुंबई: बुधवार, दिनांक 19 नोव्हेंबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये सोयाबीन, कांदा व मक्याची आवक आणि भाव पाहू.
मक्याचे दर गडगडले: राज्याच्या कृषीमार्केट मध्ये आज एकूण 61 हजार 516 क्विंटल मक्याची आवक झाली. यापैकी नाशिक मार्केटमध्ये 10 हजार 094 क्विंटल सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 1233 ते जास्तीत जास्त 2025 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 3 क्विंटल मक्यास 2400 ते 2700 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
कांद्याची उच्चांकी आवक: राज्याच्या मार्केटमध्ये 1 लाख, 89 हजार 074 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 90 हजार 997 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 316 ते 1766 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच सोलापूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 776 क्विंटल कांद्यास 200 ते 3300 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
सोयाबीनची आवक स्थिर: राज्याच्या मार्केटमध्ये 60 हजार, 299 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. यापैकी वाशिम मार्केटमध्ये 16 हजार 500 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 4105 ते 4660 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच जालना मार्केटमध्ये आवक झालेल्या 11 हजार, 931 क्विंटल पिवळ्या सोयाबीनला प्रतीनुसार 4150 ते 5321 रुपये प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Krushi Market Rate: कांद्याची आवक वाढली, दर घसरले; सोयाबीनला विक्रमी दर, इतर शेतमालाला भाव किती?
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement