गोंदियातील 52,214 महिला लाडकी बहीणसाठी अपात्र, धक्कादायक माहिती समोर

Last Updated:

लाडकी बहीण योजनेत 14 हजार पुरुषांनी महिलांच्या नावावर लाभ घेतल्याचे आणि 9 हजार सरकारी कर्मचारी महिलांनी लाभ घेतल्याचे समोर आले आहे. गोंदियामध्ये 52 हजार महिलांची नावे यादीतून वगळली आहेत.

News18
News18
लाडकी बहीण योजनेत घोटाळ्यात घोटाळे समोर येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ज्या लाभार्थ्यांचे घोटाळे आहेत त्यांची नावं यादीतून वगळण्यात आली आहे. या योजनेत 14 हजार पुरुषांनी महिलांच्या नावावर लाभ घेतल्याचं समोर आलं होतं. दुसरं म्हणजे जवळपास 9 हजार सरकारी कर्मचारी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला, तर 65 वर्षांवरील महिला आणि एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतलेल्यांची आकडेवारी काही दिवसांपूर्वी समोर आली होती.
या सगळ्या अपात्र महिलांची नावं यादीतून वगळण्यात आली आहेत. दुसरीकडे गोंदियामध्ये लाडकी बहीण योजनेचा मोठा फटका बसला आहे. 52 हजार महिलांची नावे यादीतून वगळण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील महिलांसाठी सुरू असलेल्या एका योजनेत तब्बल 52,214 अर्ज अपात्र ठरल्याने 'लाडक्या बहिणीं'मध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यातून एकूण 3 लाख 12 हजार 220 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत, तर अपात्र ठरलेल्या अर्जांची संख्या मोठी असल्याने अनेकांच्या आशांवर पाणी फिरलं आहे. या महिलांना रक्षाबंधनआधी कोणताही हप्ता मिळणार नाही. तुमचंही नाव वगळं आहे की नाही ते लाडकी बहीण योजनेच्या वेबसाइटवर जाऊन लगेच तपासा, वगळलं असेल तर हप्ता येणार नाही.
advertisement
या मोठ्या संख्येने अर्ज अपात्र होण्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कागदपत्रांची पूर्तता नसणं, चुकीची माहिती देणं किंवा इतर तांत्रिक अडचणी यामागे असू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे ज्या भगिनींनी मोठ्या आशेने अर्ज केले होते, त्यांची धाकधूक आता वाढली आहे. प्रशासनाने या अपात्र अर्जांबाबत लवकरच स्पष्टीकरण देऊन, पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळेल याची खात्री द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
advertisement
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस जुलै महिन्याचा सन्मान निधी 1500 रुपये वितरित करण्यात येणार आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल. अशी माहिती आदिती तटकरे यांनी स्वत: ट्विट करुन दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गोंदियातील 52,214 महिला लाडकी बहीणसाठी अपात्र, धक्कादायक माहिती समोर
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement