advertisement

Latur News : 10 रुपयांच्या नाण्याबद्दल लातूरमध्ये अफवा, व्यापाऱ्यांची उडाली झोप, जिल्हा प्रशासनाने घेतली दखल

Last Updated:

Latur News : लातूर जिल्ह्यात दहा रुपयाचे नाणे बंद झाल्याच्या अफवा पसरल्याने व्यापाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.

News18
News18
लातूर, 27 नोव्हेंबर (नितिन बनसोडे, प्रतिनिधी) : भारतीय चलनातील 10 रुपयांच्या नाण्याबद्दल गेल्या काही वर्षांपासून संभ्रम पाहायला मिळतो. अनेक ठिकाणी हे नाणं बंद झाल्याचं सागून स्वीकारण्यास टाळाटाळ करताना पाहायला मिळते. लातूर जिल्ह्यात 10 रुपयाच्या नाण्यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. इथले ग्राहक व्यापाऱ्यांकडून 10 रुपयांचे नाणे स्वीकारत नसल्याचे समोर आले आहे. 10 रुपयांचे नाणे बंद झाले आहे, त्यामुळे आम्ही घेणार नाहीत असे ग्राहकांकडून व्यापाऱ्यांना सांगण्यात येत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये डोकेदुखी वाढली. हे प्रकरण इतक्या टोकाला गेले की जिल्हा प्रशासनाला यामध्ये लक्ष घालावे लागले आहे.
काय आहे प्रकरण?
लातूर जिल्ह्यात सध्या प्रचलित असलेल्या दहा रुपयाचं नाणे बंद असल्याची अफवा पसरली आहे. यामुळं प्रचलित असलेले दहा रुपयाचे नाणे हे लातूर जिल्ह्यातील बाजारात व्यापाऱ्याकडून आणि ग्राहकाकडून बंद झाल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे प्रचलित असलेले नाणे हे व्यवहारात स्वीकारले जात नसल्याने व्यापाराची आणि ग्राहकाची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वादही होत असल्याचं पाहायला मिळतय. तर हे नाणं ग्रामीण भागातील दुकानदार घेतच नाहीत तर मग आम्ही हे नाणे कशासाठी घ्यायचं? असा प्रश्नही ग्राहक उपस्थित करत आहेत. पण हे प्रचलित नाण न स्वीकारण हे कायद्याने गुन्हा असल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
advertisement
दहा रुपयांच्या नाण्यावर कोणतीही बंदी नाही
आरबीआयच्या नियमाप्रमाणे प्रचलीत असलेले नाणे न स्विकारणे हा गुन्हा आहे. त्यामुळे 10 रुपयांचे नाणे स्विकारण्यास नकार देणारे व्यक्ती कारवाईस पात्र राहातील, याची नोंद घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून याबाबत सर्व बँकांनी जनजागृती करावी, अशी सूचनाही जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांच्या शाधाधिकाऱ्यांना दिली आहे.
advertisement
लातूर जिल्ह्यात दहा रुपयाचे नाणे स्वीकारण्यास सर्वत्र नकार मिळत असून, हा राजमुद्रेचा अवमान आहे. बँकांनी व प्रशासनाने याकडे डोळेझाक केली, त्यामुळे नागरिकांमध्ये कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे. दहा रुपयाचे नाणे स्थानिक तथा परिसरात सर्वत्र स्वीकारण्यास चक्क नकार मिळत असून त्यामुळे सदर नाणी बंद झाल्याची अफवा पसरली आहे. आता नागरिकही हे नाणे एकमेकांकडून स्वीकारत नसल्याने नाणे चलनातून बाद झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
view comments
मराठी बातम्या/लातूर/
Latur News : 10 रुपयांच्या नाण्याबद्दल लातूरमध्ये अफवा, व्यापाऱ्यांची उडाली झोप, जिल्हा प्रशासनाने घेतली दखल
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement