advertisement

PhDवाले मास्तर निघाले ‘चोर’, नीटचा पेपर फोडणारे लातूरमधले 3 शिक्षक कोण?

Last Updated:

नीटमध्ये गुण अधिकचे मिळवून देण्यासाठी लातूरचे दोन जण काम करत असल्याचे एटीएसच्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.

News18
News18
लातूर : नीट यूजी परीक्षेतील घोटाळ्याचे महाराष्ट्रातील धागेदोरे उघड झाल्यानंतर आता 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी ताब्यात घेतलेल्या लातुरातील दोन शिक्षकांना चौकशीनंतर रात्री उशिरा सोडून देण्यात आले होते. मात्र, त्यांच्या सुटकेला 12 तासही उलटत नाहीत तोच रविवारी पुन्हा एक शिक्षकाला अटक करण्यात आली. धक्कादायक म्हणजे यातील दोन शिक्षक तर पीएचडीधारक आहेत.
नीटमध्ये गुण अधिकचे मिळवून देण्यासाठी लातूरचे दोन जण काम करत असल्याचे एटीएसच्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या दोन शिक्षकांसह धाराशिव आणि दिल्ली येथील एक जण अशा चौघांविरोधात लातूरच्या शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूर हुन पैसे धाराशिव ला नंतर दिल्ली ला पाठवण्यात येत होते. आता या शिक्षकांबद्दल धक्कादायक माहिती समोर आली असून त्यातले दोघे जण पीएचडी करत असल्याची माहिती समजते.
advertisement
नीट पेपर फुटी प्रकरणात संजय जाधव , जलील पठाण आणि इरण्णा कोनगलवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. संजय जाधव हे मूळचे चाकूर तालुक्यातील बोथी तांडा येथील रहिवाशी आहेत. सध्या ते सोलापुच्या टाकळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत. संजय जाधव हे पीएचडी धारक आहेत व लातूरत राहतात.
advertisement
जलील पठाण हे लातूर शहरातील अंबाजोगाई रोड परिसरातील रहिवाशी आहेत, व सध्या ते लातूर तालुक्यातील कातपूर जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक आहेत. हे देखील पीएचडी धारक आहेत . तर इरण्णा कोनगलवार हे मुळ देगलूर जिल्हा नांदेड़ येथील रहिवाशी आहेत. ते नेमकं काय करतात हे समोर आलेलं नाही. मात्र हे तिघेजण लातूरहुन दिल्लीला पेपर लीकसाठी पैसे पाठवत असल्याची माहिती समोर आलीय. या तिघांवर नीट पेपर फोडून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याच्या रॅकेट मध्ये सहभाग असल्याचा संशय आहे. त्यामुळे लातुरात यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद आहे .
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/लातूर/
PhDवाले मास्तर निघाले ‘चोर’, नीटचा पेपर फोडणारे लातूरमधले 3 शिक्षक कोण?
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement