Loksabha Elections 2024 : चंद्रपुरात धानोरकरांची वडेट्टीवारांवर मात, पण खरी 'लढाई' आता सुरू होणार?

Last Updated:

अखेर काँग्रेसनं चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची उमेदवारी जाहीर केली. रविवारी रात्री प्रतिभा धानोकर यांचं नाव जाहीर करण्यात आलं. आणि चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवारीचा सस्पेन्स संपला. चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवारीवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यात चांगलीच चुरस रंगली होती.

चंद्रपुरात धानोरकरांची वडेट्टीवारांवर मात, पण खरी 'लढाई' आता सुरू होणार?
चंद्रपुरात धानोरकरांची वडेट्टीवारांवर मात, पण खरी 'लढाई' आता सुरू होणार?
चंद्रपूर : अखेर काँग्रेसनं चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची उमेदवारी जाहीर केली. रविवारी रात्री प्रतिभा धानोकर यांचं नाव जाहीर करण्यात आलं. आणि चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवारीचा सस्पेन्स संपला. चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवारीवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यात चांगलीच चुरस रंगली होती. मात्र प्रतिभा धानोरकर लोकसभेचं तिकीट मिळवण्यात यशस्वी ठरल्या. पण आता प्रचारात वडेट्टीवार धानोरकरांना साथ देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
खरं तर चंद्रपूर लोकसभेच्या जागेवरून काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु होती. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवर या चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून उमेदवारीसाठी आग्रही होत्या. त्यांनी दिल्लीत काँग्रेस हायकमांडकडे उमेदवारीसाठी साकडं घातलं होतं. तर विजय वडेट्टीवारांनीही आपल्या कन्येसाठी दिल्लीत फिल्डिंग लावली होती.
प्रतिभा धानोकर यांनीही उमेदवारीसाठी सर्व राजकीय शक्तीपणाला लावली होती, त्यामुळे निवडणुकीआधीच काँग्रेसमधील कुरघोडीचं राजकारण चव्हाट्यावर आलं होतं. काँग्रेसकडून चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी धानोरकर की वडेट्टीवारांना मिळणार याविषयी उत्सुक्ता निर्माण झाली होती. पण पक्षांतर्गत चाढाओढीत प्रतिभा धानोकर यांचं पारडं जड ठरलं.
advertisement
इकडे काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी धानोरकर आणि वडेट्टीवारांमध्ये चुरस लागली होती. तर दुसरीकडे भाजपात या उलट चित्र होतं. चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून भाजपने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. खरं तर सुधीर मुनगंटीवार हे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नव्हते, तसं त्यांनी जाहीरही केलं होतं. पण भाजपनं मुनगंटीवारांची उमेदवारी जाहीर करत राजकीय धक्का दिला.
advertisement
गेल्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर लोकसभेतून प्रतिभा धानोरकर यांचे पती बाळू धानोरकर हे काँग्रेसचे एकमेव खासदार निवडून आले होते. ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश करत धानोकरांनी चंद्रपूरची जागा खेचून आणली होती. त्यांच्या निधानामुळे ही जागा रिक्त झाली होती. आता त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोकर लोकसभेच्या रंगणात आहेत. एकीकडे अनिच्छेने का होईना मुनगंटीवार लोकसभेच्या आखाड्यात उतरले आहेत, तर दुसरीकडे आपल्या मुलीसाठी उमेदवारीचा प्रयत्न करणारे वडेट्टीवार धानोरकरांना किती मदत करणार? यावर चंद्रपूर लोकसभेचा निकाल ठरणार आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Loksabha Elections 2024 : चंद्रपुरात धानोरकरांची वडेट्टीवारांवर मात, पण खरी 'लढाई' आता सुरू होणार?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement