Loksabha Elections 2024 : प्रकाश आंबेडकरांविरोधात काँग्रेसने उमेदवार दिला, अकोल्यात होणार तिरंगी सामना
- Published by:Shreyas
Last Updated:
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आणखी एक यादी जाहीर केली आहे, यामध्ये महाराष्ट्रातल्या अकोल्याच्या जागेचा समावेश आहे.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आणखी एक यादी जाहीर केली आहे, यामध्ये महाराष्ट्रातल्या अकोल्याच्या जागेचा समावेश आहे. अकोल्यातून काँग्रेसने डॉक्टर अभय पाटील यांना उमेदवारी दिली आहे, तर वंचित बहुजन आघाडीने आधीच प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. तर भाजपने अकोल्यातून अनुप धोत्रे यांना रिंगणात उतरवलं आहे, त्यामुळे अकोल्यामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला राज्यात 7 जागांवर पाठिंबा जाहीर केला आहे, पण काँग्रेसने अकोल्यात प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात उमेदवार दिला आहे. महाविकासआघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रकाश आंबेडकर बैठकांना उपस्थित राहिले, तसंच वंचितच्या प्रतिनिधींनीही बैठकीला हजेरी लावली, पण प्रकाश आंबेडकरांच्या वंचितचा महाविकासआघाडीमध्ये समावेश होऊ शकला नाही, त्यामुळे वंचितने त्यांचे उमेदवार घोषित केले आहेत.
advertisement
2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्येही अकोल्यात तिरंगी लढत झाली होती. भाजपच्या संजय धोत्रे यांचा या मतदारसंघात विजय झाला, तर प्रकाश आंबेडकर दुसऱ्या क्रमांकावर राहिले. काँग्रेसचे हिदायतुल्ला पटेल तिसऱ्या क्रमांकावर आले. 2019 ला संजय धोत्रे यांना 5,54,444 मतं मिळाली तर प्रकाश आंबेडकर यांनी 2,78,848 मतं घेतली. काँग्रेसच्या उमेदवाराला 2,54,370 मतं मिळाली होती.
Location :
Akola,Maharashtra
First Published :
April 01, 2024 10:28 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Loksabha Elections 2024 : प्रकाश आंबेडकरांविरोधात काँग्रेसने उमेदवार दिला, अकोल्यात होणार तिरंगी सामना