Viral होण्यासाठी चार चाकी फोडल्या, ड्रायव्हरला मारलं, पोलिसांनी लोणावळ्याच्या भुरट्या भाईला गुडघ्यावर आणलं!
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
मारहाण केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत वाकसई भागातून कथित भाई रोहित गुत्ता याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
अनिस शेख, प्रतिनिधी, लोणावळा पुणे : सध्या सोशल मीडियावर भाईगिरी तसेच गुंडागिरी करणाऱ्यांचे व्हिडिओ तरुण पिढीकडून जास्त पाहिले जातात तसेच त्याला लाईक आणि शेअरही मोठ्या प्रमाणात केले जाते. अशाच प्रकारे सोशल मीडियात व्हायरल होण्यासाठी दहशत पसरवून वाहन चालकाला मारहाण करणाऱ्या कथित भाईला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे.
लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत वरसोली टोल नाका येथे चार चाकी वाहन थांबवून नाश्ता करण्यासाठी गेलेल्या एका वाहनचालकास रोहित रामकिसन गुप्ता याने बेदम मारहाण करत गाडीच्या काचा फोडून वाहनाचे मोठे नुकसान केले. संबंधित घटना घडत असताना गुप्ता याने त्याच्या सोबत असलेल्या मित्राला संबंधित व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्यास सांगितले.
advertisement
VIDEO व्हायरल कर, सहकाऱ्याला सांगितलं, पोलिसांनी तोच VIDEO पाहिला, अन् खाकी स्टाईलने समाचार घेतला
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत वाकसई भागातून कथित भाई रोहित गुत्ता याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेप्रकरणी तात्याराव सपकाळ या वाहन चालकाने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
फटके पडल्यावर अक्कल आली
advertisement
पोलिसांनी गुप्ताचा पाहुणचार खाकी स्टाईलने केल्याने यापुढे आयुष्यात पुन्हा कधी भाईगिरी करणार नाही, असे उद्गार फटके पडल्यानंतर भाईने काढले. असे प्रकर शहरात जर कुठे घडत असेल तर वाहन चालक तसेच नागरिकांनी तात्काळ पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांनी केले आहे.
view commentsLocation :
Lonavala (Lonavla),Pune,Maharashtra
First Published :
November 16, 2025 5:20 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Viral होण्यासाठी चार चाकी फोडल्या, ड्रायव्हरला मारलं, पोलिसांनी लोणावळ्याच्या भुरट्या भाईला गुडघ्यावर आणलं!


