Gautam Gambhir : टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव कुणामुळे झाला? गंभीर मीडियासमोर आला, मनातलं सगळं बाहेर काढलं!

Last Updated:

गौतम गंभीरचं कोच म्हणून टेस्ट क्रिकेटमधलं रेकॉर्ड आणखी खराब झालं आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाला 30 रननी पराभूत केले.

टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव कुणामुळे झाला? गंभीर मीडियासमोर आला, मनातलं सगळं बाहेर काढलं!
टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव कुणामुळे झाला? गंभीर मीडियासमोर आला, मनातलं सगळं बाहेर काढलं!
कोलकाता : गौतम गंभीरचं कोच म्हणून टेस्ट क्रिकेटमधलं रेकॉर्ड आणखी खराब झालं आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाला 30 रननी पराभूत केले. दक्षिण आफ्रिकेने 15 वर्षांत पहिल्यांदाच भारतीय भूमीवर टेस्ट सामना जिंकला. 124 रनचे छोटे लक्ष्य गाठण्यात टीम इंडियाला अपयश आले. सायमन हार्मर आणि केशव महाराज यांच्यासमोर भारतीय बॅटर अपयशी ठरले. या धक्कादायक पराभवाबद्दल भारतीय प्रशिक्षक गौतम गंभीरने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 124 रनच्या आव्हानाचा पाठलाग सहज करता आला असता, असं गंभीर म्हणाला आहे.

गौतम गंभीरची पहिली प्रतिक्रिया

'आम्हाला पिच क्युरेटरकडून बराच पाठिंबा मिळाला. खेळपट्टी कशीही असली तरी 123 रनचा पाठलाग करणं शक्य होते. जर तुम्ही धीर धरला असता आणि चांगला डिफेन्स केला असता तसंच प्रयत्न केले असते तर रन करू शकला असतात. आम्हाला पाहिजे तशी खेळपट्टी मिळाली होती', असं गौतम गंभीर म्हणाला आहे.
advertisement
'ही अशी खेळपट्टी नाही जिथे तुम्ही बॅटिंगने उत्कृष्ट कामगिरी करू शकता किंवा मोठे फटके मारू शकता, पण जर तुम्ही संयम दाखवला तर तुम्ही रन करू शकता. आम्हाला अशी खेळपट्टी हवी होती. मी आधी सांगितले आहे की आम्हाला पिच क्युरेटरकडून खूप पाठिंबा मिळाला. आम्हाला हे हवे होते, पण जेव्हा तुम्ही चांगले खेळत नाही तेव्हा असा निकाल लागतो', अशी प्रतिक्रिया गंभीरने दिली आहे.
advertisement

गंभीरचं खराब कोचिंग रेकॉर्ड

गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून टीम इंडियाने 18 सामने खेळले, यात टीम इंडियाला फक्त 7 मॅच जिंकता आल्या आहेत, तर 9 सामन्यात भारताचा पराभव झाला आणि 2 मॅच ड्रॉ झाल्या. गंभीर प्रशिक्षक असताना भारताचा न्यूझीलंडविरुद्ध घरच्याच मैदानात 3-0 ने लाजिरवाणा पराभव झाला, तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बॉर्डर-गावसकर ट्रॉफीही भारताने गमावली. यानंतर इंग्लंड दौऱ्यात भारताने टेस्ट सीरिज 2-2 ने ड्रॉ केली. आता दक्षिण आफ्रिकेनेही टीम इंडियाचा पराभव केला आहे, त्यामुळे गंभीरच्या टेस्ट क्रिकेटमधल्या कोचिंगवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Gautam Gambhir : टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव कुणामुळे झाला? गंभीर मीडियासमोर आला, मनातलं सगळं बाहेर काढलं!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement