advertisement

कष्टाचं चीज झालं! हजारो रूपयांपासून सुरू केलेला ‘वन-स्टॉप’ सेंटरचा व्यवसाय लाखाच्या घरात

Last Updated:

उल्हासनगरमध्ये एका दुकानात काम करत असताना स्वतःचा काहीतरी व्यवसाय हवा, या उद्देशाने विठ्ठल संते यांनी 11 हजार रुपयांपासून घरातूनच छोटासा व्यवसाय सुरू केला. आज त्याच व्यवसायाने त्यांना लाखो रूपयाचा धंदा करून दिला आहे.

+
The

The hard work paid off

उल्हासनगरमध्ये एका दुकानात काम करत असताना स्वतःचा काहीतरी व्यवसाय हवा, या उद्देशाने विठ्ठल संते यांनी 11 हजार रुपयांपासून घरातूनच छोटासा व्यवसाय सुरू केला. आज यामध्ये त्यांनी लहान मुलांच्या छोट्या- मोठ्या वस्तू तसेच स्त्रियांच्या अलंकारापासून ते मयताच्या केफनापर्यंत सर्व वस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत. या ठिकाणी आल्यावर गिऱ्हाईक हव्या असलेल्या वस्तू अगदी कमी भावात खरेदी करू शकतो. यांच्या या घरगुती दुकानाचा फायदा कल्याण मधील अनेक गावांना होताना दिसतो.
जेमतेम 11 हजार रुपयांपासून उभा केलेला व्यवसाय लाखाच्या घरात पोहोचला आहे. तसेच कल्याण मधील संतेपाडा गावापासून शहराचे अंतर लांब असल्याने दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी कल्याण, टिटवाळा किंवा मोहने आंबिवली शिवाय आसपासच्या गावांना पर्याय नव्हता. परंतु संतेपाडा मधील विठ्ठल संते यांनी गेली 6वर्षापासून स्वतःच्या स्वबळावर लॉकडाउनच्या काळात घरातच दैनंदिन आणि वस्तूंचा छोटासा व्यवसाय सुरू केला. विट्ठल संते यांनी कमी पैशात उभा केलेला हा व्यवसाय यात लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंतचे सर्व सामानांचे ते विक्री करतात.
advertisement
विठ्ठल संते त्यांच्या दुकानात चप्पल, नॉव्हेल्टी सामान, खाऊ, पूजेचे साहित्य असे सामान उपलब्ध आहेत. मुख्य म्हणजे तालुक्यातील आसपासच्या अकरा गावांना या दुकानाचा फायदा होत असून मयतीच्या वेळ लागणारे कफन,आठरा धान्य, मडकी सर्व काही साहित्य संते यांच्या दुकानामध्ये मिळते. म्हणजे कोणत्याही वेळी या ठिकाणी येणाऱ्या लोकांना सामान उपलब्ध असते. कमी खर्चात उभारलेला हा व्यवसाय आज चांगल्या पद्धतीत फायदा होत असल्याने विठ्ठल संते यांचे संपूर्ण कुटुंब या व्यवसायावर अवलंबून आहे. संते हे उल्हासनगर मधील एका कपड्याच्या दुकानात कामगार म्हणून होते.
advertisement
परंतु रोजची दगदग आणि धावपळ यामुळे त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने घरातच व्यवसाय सुरू करण्याचा ध्यास घेतला आणि आजच्या घडीला त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे.तरी संते यांना त्यांच्या दुकानात भविष्यात आणखी बदल करून ज्या वस्तू मोठमोठ्या दुकानात उपलब्ध आहेत त्या सर्व वस्तू त्यांच्या दुकानात मिळतील जेणेकरून दुकानात ग्राहकांनी मागितलेली वस्तू नाही असा शब्दच नको यासाठी आणखी प्रयत्न करून हा व्यवसाय घरातच वाढवण्याचा प्रयत्न त्यांचा आहे.आजकाल घर शो च्या वस्तू आणि टापटीप ठेवण्यासाठी लोक धडपडत असतात.परंतु संते कुटुंबाने घर सजावट ही त्यांच्या व्यवसायानेच केली आहे. एक प्रकारे या व्यावसायिक कुटुंबाने त्यांचं घर अनेक वस्तूंनी सजवून व्यवसाय उभारला आहे.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
कष्टाचं चीज झालं! हजारो रूपयांपासून सुरू केलेला ‘वन-स्टॉप’ सेंटरचा व्यवसाय लाखाच्या घरात
Next Article
advertisement
Budgetमधील मोठी बातमी, 75 वर्षांत पहिल्यांदाच असं होणार; एका बदलामुळे अर्थतज्ज्ञही चक्रावले, उद्या काय घडणार?
Budgetमधील मोठी बातमी, पहिल्यांदाच असं होणार; एका बदलामुळे अर्थतज्ज्ञही चक्रावले
  • यंदाच्या बजेटमध्ये मोठा 'ट्विस्ट'

  • देशाची दिशाच बदलणार

  • 'Part A' नाही तर 'Part B' करणार धमाका

View All
advertisement