advertisement

Maharashtra Election : आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याआधी संभाजीनगरमध्ये शिवसेनेला मोठं खिंडार

Last Updated:

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सध्या महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरात तयारी सूरू आहे. त्याच आदित्य ठाकरेंची काही दिवसांवरच संभाजीनगरमध्ये सभा पार पडणार आहे. पण सभेआधीच ठाकरे गटाला धक्का बसला आहे.

ठाकरे गटाला मोठं खिंडार
ठाकरे गटाला मोठं खिंडार
छत्रपती संभाजीनगर : आगामी विधानासभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे संभाजीनगरचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याआधीच ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं आहे. ठाकरे गटाचे 2 माजी नगरसेवक आणि 12 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. अंतर्गत गटबाजीला कंटाळून या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोडांवर ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सध्या महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरात तयारी सूरू आहे. त्याच आदित्य ठाकरेंची काही दिवसांवरच संभाजीनगरमध्ये सभा पार पडणार आहे. पण सभेआधीच ठाकरे गटाला धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे 2 माजी नगरसेवक आणि 12 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे यांच्या अंतर्गत गटबाटबाजीला कंटाळून या पदाधिकाऱ्याने राजीनामे दिले आहेत. तसेच पुढे आम्ही हिंदुत्वासाठी काम करणार आहेत. नेमका कुणाचं काम करणार हे दोन-तीन दिवसात सांगू असं देखील पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
advertisement
वरळीत शिंदेंना मोठा झटका
वरळी विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.कारण शिंदे गटातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेना युबीटीत प्रवेश केला आहे. शिंदे गटाच्या उपविभाग प्रमुख रेणुका तांबे, शाखा प्रमुख संतोष शिंदे, शाखाप्रमुख श्रीकांत जावळे, अनवर दुर्रानी (शिंदे गट) यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मातोक्षीवर आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला आहे. या प्रवेशाने शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Election : आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याआधी संभाजीनगरमध्ये शिवसेनेला मोठं खिंडार
Next Article
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement