बाळासाहेबांचं कौतुक करून दाखवा, मोदी-शाहांनी राहुलला डिवचले, प्रियांकांकडून सडेतोड उत्तर
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
शिर्डीच्या सभेत प्रियांका गांधी बोलत होत्या. यावेळी बोलताना प्रियांका गांधी म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवेळी बाळासाहेबांच नाव घेऊन माझा भाऊ राहुलचा संदर्भ देतात, पण मी राहुलची बहीण आहे हे लक्षात ठेवावे
शिर्डी : एकदा तरी राहुल गांधींच्या तोडून हिंदुहद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे बोलवून दाखवा, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना देत राहुल गांधी यांना देखील डिवचलं होतं. आता पंतप्रधान मोदींच्या या आव्हानाला प्रियांका गांधींनी उत्तर दिलं आहे. बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसची विचारधारा जरी वेगळी असली तर आम्ही कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन केला नसता, अशा शब्दात आता प्रियांका गांधी यांना पंतप्रधान मोदींना उत्तर दिलं आहे.
शिर्डीच्या सभेत प्रियांका गांधी बोलत होत्या. यावेळी बोलताना प्रियांका गांधी म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवेळी बाळासाहेबांच नाव घेऊन माझा भाऊ राहुलचा संदर्भ देतात, पण मी राहुलची बहीण आहे हे लक्षात ठेवा. बाळासाहेब ठाकरे आणि आमची विचारधारा वेगळी होती. पण ना बाळासाहेब ठाकरे ना काँग्रेस पार्टीचा कोणताही नेता, राहुल गांधी, ना काँग्रेसचा आजचा नेता यांनी शिवाजी महाराजांचा कधीच अपमान सहन केला नसता, असे म्हणत सिंधुदुर्गातील पुतळा दुर्घटनेवरून प्रियांका गांधी यांनी पंतप्रधानांना लक्ष्य केले आहे.
advertisement
जसं तुम्ही आम्हाला आव्हान देता तंस मी तुम्हाला आव्हान देते. स्टेजवरून उभं राहून तुम्ही सांगाव की मी जातीय जणगणना करायला तयार आहे. आरक्षणाची 50 टक्केची मर्यादा हटवून टाकेन, हे बोलून दाखवावं असं आव्हान प्रियांका गांधी यांना पंतप्रधान मोदी यांना दिले आहे.
मोदी राहुल गांधीवर आरोप करतात की ते आरक्षण विरोधी आहेत. पण तो त्या व्यक्तीने मणिपूर ते मुंबईपर्यंत न्यायासाठी न्याय यात्रा काढली. आणि त्या व्यक्तीबद्दल तुम्ही बोलता तो आरक्षणविरोधी आहे. स्टेजवरून मोदी खोटं बोलतातय. कारण त्यांना माहितीय या यांत्रांमधून राहुल गांधी यांनी जातीय जनगणनाची मागणी केली आहेत. त्यामुळे मोदी घाबरले आहेत, असे प्रियांका गांधी म्हणाल्या आहेत.
Location :
Shirdi,Ahmadnagar,Maharashtra
First Published :
November 16, 2024 3:20 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बाळासाहेबांचं कौतुक करून दाखवा, मोदी-शाहांनी राहुलला डिवचले, प्रियांकांकडून सडेतोड उत्तर