निवडणुकीच्या तोंडावर लक्ष्मण हाकेंवर गंभीर आरोप, ओबीसी उमेदवार म्हणाला माझ्यावर जीव देण्याची वेळ आली
- Published by:Prachi Amale
Last Updated:
लक्ष्मण हाकेंची एकही सभा मी गेवराई मतदार संघात होऊ देणार नाही, असा इशारा देखील ओबीसी उमेदवाराने दिला आहे.
बीड : लक्ष्मण हाके यांनी आहे, असा गंभीर आरोप ओबीसी उमेदवाराने केला आहे. स्वतः हाके सरांनी मला तिकीट देऊन फसवणूक केली. अचानक डोक्यात धोंडा टाकला. त्यामुळे आता हाकेंची एकही सभा मी गेवराई मतदार संघात होऊ देणार नाही, असा इशारा बीडच्या गेवराईमधील ओबीसीचे उमेदवार परमेश्वर वाघमोडे यांनी दिला आहे.
परमेश्वर वाघमोडे म्हणाले, लक्ष्मण हाकेंनी मला तिकीट देऊन आमदार करतो असा शब्द दिला. पण आमिषाला बळी पडून मॅनेज झाले आणि अचानक धनदांडग्या दुसऱ्याच उमेदवाराला पाठिंबा दिला.माझी फसवणुक केली. माझ्यावर आता आत्महत्या करण्याची वेळ आणली. लक्ष्मण हाके यांनी दोन दिवसापूर्वी गेवराई मतदार संघात वंचित उमेदवार प्रियंका खेडकर यांना पाठिंबा दिला होता.. त्यानंतर लक्ष्मण हाके यांनी माझ्यावर आत्महत्येची वेळ आणली असून त्यांची एकही सभा गेवराई होऊ देणार नाही सभा घ्यायला आले तर मी आत्महत्या करेल.
advertisement
लक्ष्मण हाकेंच्या भूमिकेवरून संशय: परमेश्वर वाघमोडे
परमेश्वर वाघमोडे म्हणाले, लक्ष्मण हाकेंच्या भूमिकेवरून संशय येत आहे. पंधरा वर्षापासून सरांसोबत संबंध आहेत. वडिगोद्री उपोषणाला बसले त्यावेळी उपोषण यशस्वी करण्यासाठी जीवाचं रान केलं.. रास्ता रोको केल्यामुळे माझ्यावर 15 गुन्हे दाखल आहेत. तरी माझा विचार न करता धनदांडग्या उमेदवाराला पाठिंबा दिला.तुम्ही ज्या ज्या वेळी आंदोलनासाठी हाक दिली त्यावेळी घरदार सोडून रस्त्यावर उतरलो. चळवळी जिवंत ठेवल्या.
advertisement
दबाव आणल्यामुळे पाठिंबा दिला, हाकेंवर ओबीसी उमेदवाराचा गंभीर आरोप
पदयात्रा काढायला लावली दोन वेळेस सभेला देखील आले. काल अचानक त्यांचं काय सेटलमेंट झालं हे मला सांगता येणार नाही. परंतु माझ्यावर त्यांनी अन्याय केला आहे.. दबाव आणल्यामुळे पाठिंबा दिला असा हाके सांगत आहेत.. दबाव कुठे असं व्हायलाच नाही पाहिजे जो नेता चळवळीचा आहे तो जर दबाव कुठे एखाद्याचा उल्लेख करत असेल ही चळवळ बंद पडेल. हाकेंनी पत्रकार परिषद घेऊन आणखी मी कोणालाही पाठिंबा नाही. ओबीसीच्या चळवळीमध्ये रस्त्यावर उतरणाऱ्या अनेक कार्यकर्ते आहेत म्हणून मैत्रीपूर्ण लढत होईल असा हाकेंनी सांगावे, असे परमेश्वर वाघमोडे म्हणाले
Location :
Maharashtra
First Published :
November 15, 2024 1:42 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
निवडणुकीच्या तोंडावर लक्ष्मण हाकेंवर गंभीर आरोप, ओबीसी उमेदवार म्हणाला माझ्यावर जीव देण्याची वेळ आली