विनोद तावडेंसमोर ठाकुरांचा रुद्रावतार, भाजप नेत्याच्या बॅगेतून काय काय काढलं?

Last Updated:

विरारच्या विवांता हॉटेलमध्ये भाजपचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे उपस्थित होते.त्यांच्यासोबत भाजपचे काही पदाधिकारी होती.या घटनेची माहिती नालासोपारा विधानसभेचे उमेदवार क्षितीज ठाकूर यांना मिळताच त्यांनी कार्यकर्त्यांसह हॉटेल गाठले होते

क्षितीज ठाकुरांनी तावडेंना घेरलं
क्षितीज ठाकुरांनी तावडेंना घेरलं
वसई-विरार : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्य एक दिवस आधी विरारमध्ये तुफान राडा झाला आहे. बहुजन विकास आघाडीचे नालासोपारा विधानसभा मतदार संघाचे उमेदवार क्षितीज ठाकुर यांनी कार्यकर्त्यांसह हॉटेलमध्ये घुसून भाजपचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना घेरलं आहे.याचसोबत घटनास्थळी असलेल्या एका बॅगेतून क्षितीज ठाकूरांनी पैश्यांनी भरलेली पाकिटे, डायरी आणि लॅपटॉप बाहेर काढले आहेत. हे सर्व पुरावे दाखवून आता क्षितीज ठाकुरांनी विनोद तावडेंवर कारवाईची मागणी केली आहे.
विरारच्या विवांता हॉटेलमध्ये भाजपचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे उपस्थित होते.त्यांच्यासोबत भाजपचे काही पदाधिकारी होती.या घटनेची माहिती नालासोपारा विधानसभेचे उमेदवार क्षितीज ठाकूर यांना मिळताच त्यांनी कार्यकर्त्यांसह हॉटेल गाठले होते. यावेळी हॉटेलमध्ये पैसे वाटल्याचा आरोप करत क्षितीज ठाकूर यांच्यासह बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडेंना घेरलं आहे.
advertisement
क्षितीज ठाकूरांसह बविआ कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये घूसून विनोद तावडे यांनी घेरलं आहे.तसेच यावेळी एका कार्यकर्त्यांने घटनास्थळावरून बॅग ताब्यात घेऊन ती तपासली त्यामध्ये पैसै भरलेले लिफाफे सापडले होते. त्यानंतर बविआच्या कार्यकर्त्यांनी हे लिफाफे उघडून पैसे दाखवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.त्याचसोबत या बॅगेतून लॅपटॉप आणि काही डायऱ्या देखील सापडल्या आहेत. हे संपूर्ण दस्तावेज ताब्यात घेऊन आता क्षितीज ठाकुरांनी विनोद तावडेंवर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेची माहिती मिळताच भाजप कार्यकर्ते घटनास्थळी दाखर झाले आहेत.तसेच भाजप आणि बविआ कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला आहे.
advertisement
या संपूर्ण घडामोडीवर हितेंद्र ठाकुर यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. पाच कोटी वाटप होतायत.त्यात अनेक लॅपटॉप,डायऱ्या मिळाल्या आहेत. हे राष्ट्रीय नेते,राष्ट्रीय सरचिटणीस लाज शरम काहीच नाही सगळं घोलुन प्यायले आहे, अशी टीका बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. विनोद तावडेंनी मला 25 फोन केले..माफ करा, मला जाऊ द्या असे हितेंद्र ठाकुरांनी म्हणत पोलिसांनी कारवाई करावी, निवडणूक आयोगाने कारवाई करावी,अशी मागणी हितेंद्र ठाकुरांनी केले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
विनोद तावडेंसमोर ठाकुरांचा रुद्रावतार, भाजप नेत्याच्या बॅगेतून काय काय काढलं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement