Mahayuti : लोकसभेचा निकाल महायुतीने सहा महिन्यात कसा फिरवला? 'ही' आहेत विजयाची प्रमुख कारणे
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
विधानसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल बोलायचं झालं तर महायुतीने डबल सेच्यूरी मारत 234 जागा जिंकल्या आहेत.ज्यामध्ये भाजप 132 जागा जिंकून मोठा भाऊ ठरला आहे
Maharashtra Assembly Election Result 2024 : सहा महिन्यापूर्वीच लोकसभा निवडणुकीत महायुतीचा पराभव झाला होता. या निवडणुकीत महायुतीच्या 20 जागा देखील निवडून आल्या नव्हत्या. पण या पराभवातून धडा घेत आता महायुतीने विधानसभेत जबरदस्त वापसी करत महाविकास आघाडीचा सुपडाच साफ केला आहे. त्यामुळे सहा महिन्यापूर्वी पराभवाला सामोरे जाणाऱ्या महायुतीने विधानसभेत निकाल कसा फिरवला? महायुतीच्या विजयाची नेमकी कारणे काय आहेत? हे जाणून घेऊयात.
विधानसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल बोलायचं झालं तर महायुतीने डबल सेच्यूरी मारत 234 जागा जिंकल्या आहेत.ज्यामध्ये भाजप 132 जागा जिंकून मोठा भाऊ ठरला आहे.तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या आहेत. महाविकास आघाडीबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी फक्त 50 जागा जिंकल्या आहेत. यामध्ये शिवसेनेने सर्वांधिक 20 जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेस 16 आणि शरद पवारांच्या राष्ट्रावादीने फक्त 10 जिंकल्या आहेत. हा निकाल पाहता ठाकरेंची जादू आणि शरद पवारांचा करिश्माच महाराष्ट्रात चालला नसल्याचे समजते.
advertisement
महायुतीच्या विजयामागे सर्वांत महत्वाचं आणि पहिलं कारण ठरलंय ते म्हणजे लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजना या निवडणुकीत निर्णायक निकाल देईल याची राजकीय तज्ज्ञांना कल्पना होतीच आणि तेच झालंय. महायुतीने या योजनेची घोषणा केल्यापासून त्याची राजकीय वर्तुळात खुप चर्चा होती. या योजनेच्या माध्यमातून सरकारने 2 कोटीहून अधिक महिलांच्या खात्यात पाच महिन्याचा हप्ता म्हणजेच 7500 जमा केले होते.ज्यामुळे बहुतांश महिलांचा कल हा महायुतीला मतदान करण्याकडे राहिला. त्यामुळे महायुतीच्या विजयात महिलांचा मोठा वाटा आहे.
advertisement
विधानसभा निवडणुकीत भाजपकडून अनेक घोषणा करण्यात आल्या होत्या. स्वत: पंतप्रधान मोदी यांनी 'एक है तो सेफ है' आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'कटेंगे तो बटेंगे'ची देखील घोषणा केली होती. या घोषणेच्या माध्यमातून त्यांनी मतदारांना एक राहण्याचा सल्ला दिला होता. ज्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील मतदार जाती पातीच्या पलिकडे जाऊन महायुतीच्या मागे उभा राहिला. तर महाविकास आघाडी विरोधात भाजपने व्होट जिहादचा प्रचार केला होता. यासंबंधित व्हिडिओ देखील त्यांनी जनतेसमोर आणले होते. ज्यामुळे मतदारांनी महायुतीला पसंती दिली.
advertisement
लोकसभेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा फटका महायुतीला भरपूर बसला होता. त्यात जरांगेंनी यावेळेस देखील पाडापाडीच्या घोषणा केली होती. त्यामुळे महायुतीला मराठा मतदार दुर जाण्याची भिती होती. यासाठी त्यांनी ओबीसी मतांची एकजूट कशी राहील,याची विशेष काळजी घेतली होती. राज्यातील सर्वच मतदारसंघा ओबीसी संघटनांच्या नेत्यांच्या बैठका घेत मतांच ध्रुवीकरण होऊ नये याची पुरेपुर काळजी घेतली होती.
advertisement
लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपच्या प्रचारात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ फारसा अॅक्टीव्ह नव्हता.ज्याचा फटका भाजपलाच चांगलाच बसला होता. पण विधानसभेत मात्र हा आरएसएस निवडणुकीत अॅक्टीव्ह झाला होता आणि त्यांनी सजग रहो असे अभियान राबवले होते. तसेच अधिकाअधिक मतदान करण्याचे देखील आवाहन केले होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 23, 2024 10:45 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mahayuti : लोकसभेचा निकाल महायुतीने सहा महिन्यात कसा फिरवला? 'ही' आहेत विजयाची प्रमुख कारणे