Maharashtra Elections 2024 : अपक्षांच्या हाती सत्तेची चावी? महायुती-मविआची झोप उडवणारी आकडेवारी समोर

Last Updated:

Maharashtra Assembly Elections :यंदा राज्याच्या सत्तेची चावी ही अपक्षांच्या हाती असण्याचा अंदाज आहे. त्यामुळे निवडणूक निकालानंतर कसरत सुरू होण्याची शक्यता आहे.

अपक्षांच्या हाती सत्तेची चावी? महायुती-मविआची झोप उडवणारी आकडेवारी समोर
अपक्षांच्या हाती सत्तेची चावी? महायुती-मविआची झोप उडवणारी आकडेवारी समोर
मुंबई :  राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी काही तास राहिले आहेत. यंदाची विधानसभा निवडणूक चांगलीच चुरशीची होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे दोन्ही गट आपली कामगिरी अधिक प्रभावी करण्याच्या प्रयत्नात आहे. तर, दुसरीकडे यंदा राज्याच्या सत्तेची चावी ही अपक्षांच्या हाती असण्याचा अंदाज आहे. त्यामुळे निवडणूक निकालानंतर कसरत सुरू होण्याची शक्यता आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत 4100 च्या आसपास उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अनेक ठिकाणी थेट लढत आहे. तर, दुसरीकडे दोन्ही बाजूकडे इच्छुक असलेल्यांनी बंडाचा झेंडा फडकावत उमेदवारी जाहीर केली आहे. या निवडणुकीत अपक्षांनी देखील जोर लावला आहे. त्यामुळे निवडणूक निकालात काय होईल, याचा अंदाज बांधण्यास सुरुवात झाली आहे.
advertisement

आकडेवारीने मविआ-महायुतीला टेन्शन

अपक्ष, बंडखोरांनी राज्याच्या निवडणुकीत सरासरी 9 ते 12 टक्के मते मिळवली आहेत. तर, 30 वर्षांपूर्वी 1995 च्या निवडणुकीत अपक्षांनी जवळपास 24 टक्के मिळवली होती. या निवडणुकीत अपक्षांकडे सत्तेची चावी होती. आता, या निवडणुकीत काय होणार, याकडे लक्ष लागले आहे. यंदादेखील बंडखोर, अपक्षांची काही ठिकाणी सरशी होणार असल्याचा कयास आहे.
advertisement

1995 मध्ये काय घडलं?

1995 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला 32.16 टक्के मते मिळाली. तर, काँग्रेसला 31.23 टक्के मते, शिवसेनेला 27.7 टक्के मिळाली. त्यानंतर अपक्षांना 23.63 टक्के मते मिळाली होती. या निवडणुकीत अपक्षांनी तब्बल 45 जागा मिळाल्या होत्या. यातील अनेक अपक्ष उमेदवार हे काँग्रेसचे होते.

कोणत्या निवडणुकीत अपक्षांना किती मते?

advertisement
वर्ष     अपक्षांना किती मते टक्के
1995    23.63  टक्के
1999    9.49 टक्के
2004    14.05 टक्के
2009    15.51 टक्के
2014    4.71 टक्के
2019    9.93 टक्के
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections 2024 : अपक्षांच्या हाती सत्तेची चावी? महायुती-मविआची झोप उडवणारी आकडेवारी समोर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement