विद्यार्थी आणि पालकांची धाकधूक वाढली
पुढच्या काही मिनिटांत येणार निकाल
दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार
बारावीच्या परीक्षेचा निकाल थेट पाहा न्यूज 18 मराठीवर
या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून सर्व शाखांमधून एकूण ४२,३८८ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
त्यापैकी ४१,०२४ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले.
त्यापैकी १५,८२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ३७.६५ आहे.
कोकण विभाग सर्वात अधिक
तर सर्वात कमी लातूर विभागाचा निकाल
५४ पैकी ३७ विषयाचा निकाल १०० टक्के लागला आहे
गेल्या वर्षी पेक्षा १.४९ टक्क्यांनी कमी निकाल लागला आहे कोकण विभाग अव्वल
यंदा बारावीचा निकाल 91.88 टक्के, 13 लाख 873 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
पुणे ९१.३२
नागपूर ९०.५२
छत्रपती संभाजीनगर ९२.२४
मुंबई ९२.९३
कोल्हापूर ९३.६४
अमरावती ९१.४३
नाशिक ९१.३१
लातूर ८९.४६
कोकण ९६.७४
३३७३ केंद्रावर परीक्षा झाली, त्यापैकी काही केंद्राची चौकशी सुरू
गैरमार्ग प्रकरणं होतील त्या केंद्रावरील मान्यता कायमची रद्द होणार आहे
पुढील परीक्षेपासून ती केंद्र कायमची बंद होतील
जी केंद्र गैरमार्ग आढळली आहेत त्यांची सध्या चौकशी सुरू आहेत
गुणपडताळणीसाठी 20 मेपर्यंत अर्ज करता येणार
बोर्डाची पत्रकार परिषद सुरू
बारावीचा निकाल जाहीर
दुपारी 1 वाजता विद्यार्थी आणि पालकांना पाहता येणार
ग्रेडिंग सिस्टीमनुसार, ७५ टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्यांना डिस्टिंक्शन मिळणार
६० टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्यांना प्रथम श्रेणी
४५ टक्के ते ५९ टक्के गुण मिळवणाऱ्यांना द्वितीय श्रेणी
उत्तीर्ण होण्यासाठी ३५ पेक्षा जास्त गुण हवे.
बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात एकूण ३५ टक्के गुण मिळवणे आवश्यक
विद्यार्थ्यांना गुणांसह ग्रेड देखील मिळतील
ज्या विद्यार्थ्यांना हे किमान गुणही मिळू शकणार नाहीत त्यांना पुन्हा पुरवणी परीक्षेला बसावे लागेल.
बारावीचा निकाल पाहण्यासाठी या वेबसाईट आहेत.
mahresult.nic.in
results.digilocker.gov.in
mahahsscboard.in
https://hscresult.mkcl.org/
परीक्षेसाठी सुमारे ८.१ लाख विद्यार्थी, ६.९ लाख विद्यार्थिनी आणि ३७ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली होती.
बारावीचा निकाल mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार
बोर्डाच्या परीक्षा ११ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२५ या कालावधीत घेण्यात आल्या होत्या.
त्यासाठीची प्रात्यक्षिक परीक्षा त्यापूर्वी २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२५ दरम्यान घेण्यात आल्या होत्या.
बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार
दुपारी 1 नंतर ऑनलाईन पाहता येणार निकाल