SSC HSC Exam Time Table:दहावी, बारावीच्या परीक्षेची तारीख ठरली,महाराष्ट्र बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर!

Last Updated:

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे प्रवेशपत्र जानेवारी 2025 मध्ये जारी करण्यात येणार असून महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हॉल तिकीट प्रसिद्ध केले जाईल.

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, 2025 च्या परीक्षांच्या तारखा जाहीर
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, 2025 च्या परीक्षांच्या तारखा जाहीर
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. दहावी आणि बारावीच्या परिक्षेचे वेळापत्रक जाहीर झालं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावीची परीक्षा फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र दहावीची परीक्षा फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवडयात आयोजित केल्या जाणार आहेत. महाराष्ट्र बोर्डाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. बारावीची लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी 2024 ते 18 मार्च 2025 या कालावधीत होणार आहे. तर, दहावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालवधीत होणार आहे. दहावीची परीक्षा पहिल्या दिवशी मराठी भाषेच्या पेपरने सुरू होईल आणि बारावीच्या परीक्षेचा पहिला पेपर इंग्रजीचा असेल.
advertisement

अधिकृत संकेतस्थळावर हॉल तिकीट प्रसिद्ध

महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in  वर जाऊन विद्यार्थी वेळापत्रक डाउनलोड करू शकतात. तसेच, दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे प्रवेशपत्र जानेवारी 2025 मध्ये जारी करण्यात येणार असून महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हॉल तिकीट प्रसिद्ध केले जाईल.

10 वी आणि 12 वी परीक्षेचं वेळापत्रक जारी

advertisement
दरम्यान, एकीकडे विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असल्याने सर्वचजण निवडणूक प्रचारात आणि मतदान प्रक्रियेत दंग होते. शाळेतील शिक्षकांनाही निवडणूक मतदानाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, मतदान प्रक्रिया पार पडताच बोर्डाने 10 वी आणि 12 वी परीक्षेचं वेळापत्रक जारी केलं आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
SSC HSC Exam Time Table:दहावी, बारावीच्या परीक्षेची तारीख ठरली,महाराष्ट्र बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement