Maharashtra Coronavirus Updates : राज्यात कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय? आरोग्यमंत्र्यांनी दिली मोठी अपडेट...

Last Updated:

Maharashtra Coronavirus Updates : कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने राज्यात लोकांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाबाबतची भीतीची चर्चा सुरू झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांनी कोरोनावर महत्त्वाची अपडेट दिली आहे.

News18
News18
Maharashtra Coronavirus Updates :  राज्यात काही ठिकाणी कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. मागील काही दिवसांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने राज्यात लोकांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाबाबत भीतीची चर्चा सुरू झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांनी कोरोनावर महत्त्वाची अपडेट दिली आहे. कोरोनाला घाबरण्याचं अजिबात कारण नाही. राज्य शासन पूर्णपणे अलर्टवर असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये," असे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी म्हटले आहे.
आज मुंबईत राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांनी कोरोनाच्या साथीबाबत महत्त्वाची माहिती देत राज्यातील नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

रोगप्रतिकारशक्ती वाढलेली, परिस्थिती नियंत्रणात

"सध्या आपली सामूहिक रोगप्रतिकारशक्ती वाढलेली आहे. त्यामुळे आधीसारखा गंभीर धोका आता नाही. नागरिकांनी अनावश्यक भीती न बाळगता जागरूक राहावं," असं आबिटकर यांनी सांगितलं.
advertisement

चाचण्या, मॅपिंग सुरू, सरकार सज्ज

राज्यात साथरोग नियंत्रणासाठी चाचण्या आणि संसर्ग मॅपिंग यांचं काम सुरू आहे. शासन सर्व आजारांवर त्वरित उपचार करण्यास आणि व्यवस्थापनासाठी सक्षम असल्याचं ते म्हणाले.

केईएम रुग्णालयातील मृत्यू कोरोनामुळे नाहीत

मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. यावर स्पष्टीकरण देताना, "ही दोन्ही प्रकरणं कोमॉर्बिड पेशंट्सची होती – त्यांचा मृत्यू कोरोना मुळे झाला नाही," असं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
advertisement

हॉंगकॉंग प्रवाशांबाबत केंद्राच्या निर्देशांची प्रतीक्षा

हॉंगकॉंगमध्ये वाढलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी काही SOP येण्याची शक्यता आहे. "सध्या केंद्राकडून कोणतीही नवीन सूचना आलेली नाही. मात्र, आल्या तर त्याचे तंतोतंत पालन करण्यात येईल," असं आबिटकर यांनी सांगितलं.

कोरोना आपल्या अवतीभवती आहे, पण...

"आजही आपल्याभोवती कोरोना रुग्ण असू शकतात. मात्र, त्यांचा संसर्ग गंभीर ठरण्याची शक्यता कमी आहे. फक्त कोमॉर्बिड रुग्णांनी (विविध आजारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांनी) विशेष काळजी घ्यावी," असा सल्लाही त्यांनी दिला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Coronavirus Updates : राज्यात कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय? आरोग्यमंत्र्यांनी दिली मोठी अपडेट...
Next Article
advertisement
Raj Thackeray : बाळासाहेबांची शपथ घेत राज ठाकरेंनी दिला मोठा शब्द, मुंबईत होणार राजकीय भूकंप?
बाळासाहेबांची शपथ घेत राज ठाकरेंनी दिला मोठा शब्द, मुंबईत होणार राजकीय भूकंप?
  • महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय समीकरणांची उलथापालथ सुरू आहे.

  • मनसे मुंबईत उद्धव यांची साथ सोडून थेट महायुतीला पाठिंबा देतील अशी चर्चा

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आली आहे.

View All
advertisement