Maharashtra Elections : राज्यात 85 टक्के उमेदवारांचे डिपॉइिट जप्त, सर्वाधिक उमेदवार कोणाचे?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Elections : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी 4136 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, त्यातील 3515 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी 4136 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, त्यातील 3515 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. एकूण उमेदवारांच्या 85 टक्के इतकी उमेदवारांची ही संख्या होते. मागील 10 वर्षातील हे सर्वाधिक प्रमाण आहे. जमा झालेल्या डिपॉझिटमुळे निवडणूक आयोगाकडे सुमारे 3 कोटी 50 लाख रुपये जमा झाले.
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार एकूण वैध मतांपैकी १/६ (सरासरी) हजार मते घेणाऱ्या पराभूत उमेदवारांना त्यांची अनामत रक्कम परत दिली जाते. हा टप्पा पार न करणाऱ्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होते.
वर्ष 2014 मध्ये 4119 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यातील 3422 अर्थात जवळपास 83 टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. यातून निवडणूक आयोगाकडे 3 कोटी 40 लाख रुपये जमा झाले होते.
advertisement
मविआला फटका....
राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत सरळ लढत होती. मविआच्या 22 उमेदवारांना आपले डिपॉझिट वाचवता आले नाही. यामध्ये काँग्रेसच्या 9 शिवसेना ठाकरे गटाच्या 8 आणि शरद पवार गटाच्या 3 उमेदवारांचा समावेश आहे. मविआतील शेतकरी कामगार पक्षाच्या 2 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.
भाजपच्या सगळ्याच उमेदवारांना आपले डिपॉझिट वाचवण्यात यश आले. शिंदे गटाच्या एक आणि अजित पवार गटाच्या 3 उमेदवारांना अमानत रक्कम वाचवता आली नाही.
advertisement
सर्वाधिक उमेदवार वंचित, बसपा आणि मनसेचे
अतिशय कमी मतदान मिळाल्याने डिपॉझिट जप्त झालेल्या पक्षाच्या उमेदवारांमध्ये वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या उमेदवारांना आपले डिपॉझिट वाचवता आले नाही. या पक्षांच्या सर्वाधिक उमेदवारांची अमानत रक्कम जप्त झाली आहे.
प्रत्येक विधानसभा निवडणुकीच्या उमेदवाराला 10 हजार रुपये डिपॉझिट भरावे लागते, तर मागासवर्गीय आणि आदिवासी प्रवर्गातील उमेदवारांना 5000 रुपये भरावे लागतात.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 26, 2024 2:55 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections : राज्यात 85 टक्के उमेदवारांचे डिपॉइिट जप्त, सर्वाधिक उमेदवार कोणाचे?


