Weather Update: वर्ष बदलताच हवामानानंही बदललं रुप, कोकणावर पावसाचं संकट तर विदर्भ गारठणार
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
कोकणात छत्री काढा, विदर्भात उबदार कपडे घ्या! महाराष्ट्राच्या हवामानात मोठा 'धडाका'; नेमकं काय होतंय?
नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी अवघा महाराष्ट्र सज्ज झालेला असतानाच, निसर्गाचा एक अजब आणि तितकाच चिंताजनक खेळ पाहायला मिळत आहे. उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीने आणि दाट धुक्याने जनजीवन विस्कळीत केले असतानाच, त्याचे चटके आता महाराष्ट्रालाही बसू लागले आहेत. मात्र, महाराष्ट्रात परिस्थिती काहीशी विचित्र आणि भयानक बनली आहे. एका बाजूला महाबळेश्वरमध्ये दवबिंदू गोठवणारा गारठा पडलाय, तर दुसरीकडे मुंबई आणि कोकणात नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पावसाने तुफान बॅटिंग सुरू केली. थंडी आणि पावसाच्या या दुहेरी हल्ल्यामुळे राज्यावर हवामान बदलाचं मोठं संकट घोंघावत असून, हवामान विभागाने विदर्भ आणि मराठवाड्याला शीतलहरीचा, तर कोकणाला पावसाचा अलर्ट जारी केला आहे.
उत्तर भारतात सध्या कडाक्याची थंडी आणि झिरो व्हिजिबिलिटी असलेल्या धुक्याने थैमान घातले आहे. मध्य प्रदेशात धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, त्याचे थेट परिणाम आता महाराष्ट्राच्या हवामानावरही दिसून येत आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रातील किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्रात मात्र अचानक भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.
advertisement
2026 नव्या वर्षाच्या स्वागतालाच मुसळधार पावसानं तुफान बॅटिंग केली आहे. महाबळेश्वरमध्ये दवबिंदू गोठले आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात पुढील ४८ तासांत तापमानात मोठा बदल होणार नाही. मात्र, त्यानंतर उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढेल. विदर्भ आणि मराठवाड्यात किमान तापमानात २ ते ४ अंशांची घसरण होण्याची शक्यता आहे. कोकण आणि मुंबईत मुंबईसह किनारपट्टीच्या भागात हवामान आल्हाददायक राहील, मात्र रात्रीच्या वेळी गारवा जाणवेल.
advertisement
पश्चिम बंगालच्या उपसागरात दक्षिणेकडे सायक्लोनिक सर्क्युलेशनची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दक्षिणेकडे आता त्याच रुपांतर कमी दाबाच्या पट्ट्यात तर होत नाही ना ते पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे उत्तरेतही थंड वारे वाहात आहेत. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे विदर्भ मराठवाड्यात कडाक्याची थंडी राहणार आहे. मुंबईत आणि पालघरमध्ये पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली आहे. आज ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे.
advertisement
1 Jan 2026: 6 am, #RainMumbai
Mumbai & around it's raining with mostly cloudy skies for last more than 30 min +
Latest satellite obs shared here
Light continuous showers.
Happy New Year... pic.twitter.com/lv5CvLRB47
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 1, 2026
advertisement
कोकणातही काही भागांमध्ये आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हे पावसाचे ढग उत्तर महाराष्ट्रापर्यंत पुढे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे बागायतदारांनी काळजी घ्यावी. आंबा-काजूला आलेला मोहोर या पावसामुळे धुवून निघण्याची शक्यता आहे. नव्या वर्षात जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात थंडीचा कडाका कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असं आवाहन हवामान तज्ज्ञांनी केलं आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 01, 2026 7:14 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Weather Update: वर्ष बदलताच हवामानानंही बदललं रुप, कोकणावर पावसाचं संकट तर विदर्भ गारठणार









