Maharashtra Govt Formation : महायुतीच्या नेत्यांची पुन्हा दिल्लीवारी! अमित शाहांसोबत बैठकीची शक्यता, कारण काय?

Last Updated:

Maharashtra Mahayuti Government Formation : सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी मोठ्या हालचालींना वेग आला आहे. महायुतीच्या नेत्यांची येत्या काही तासात पुन्हा एकदा दिल्लीवारी होणार असल्याची शक्यता आहे.

महायुतीच्या नेत्यांची पुन्हा दिल्लीवारी! अमित शाहांसोबतच्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब?
महायुतीच्या नेत्यांची पुन्हा दिल्लीवारी! अमित शाहांसोबतच्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब?
तुषार रुपनवार, प्रतिनिधी, मुंबई: विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळून देखील ही महायुतीमधील सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुरू आहे. विधानसभा निवडणूक निकाल जाहीर होऊन एक आठवडा उलटला तरी स्थापनेचा दावा अद्याप करण्यात आला नाही. भाजपकडून महायुती सरकारच्या शपथविधीची तारीख जाहीर केली. त्यानंतर आता सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी मोठ्या हालचालींना वेग आला आहे. महायुतीच्या नेत्यांची येत्या काही तासात पुन्हा एकदा दिल्लीवारी होणार असल्याची शक्यता आहे.
मागील काही दिवसांपासून सरकार स्थापनेबाबतच्या हालचाली मंदावल्या होत्या. त्यातच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवस साताऱ्यातील आपल्या गावी गेले होते. त्यामुळे महायुतीत कोणतीही चर्चा झाली नाही. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने आपआपले विधीमंडळ गटनेते निवडले. मात्र, भाजपकडून अद्याप गटनेता निवडण्यात आला नाही. येत्या एक-दोन दिवसात ही प्रक्रिया पार पडणार आहे.
advertisement

महायुतीच्या नेत्यांची दिल्लीवारी...

मागील आठवड्यातील गुरुवारी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची केंद्रीय गृहमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांच्या निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत चर्चा झाली होती. त्यानंतर भाजप आणि महायुतीची बैठक होणे अपेक्षित होते. या बैठका देखील झाल्या नाहीत. अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत सरकार स्थापनेबाबतच्या काही महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. एकनाथ शिंदे यांनी आपला प्रस्ताव अमित शाह यांच्यासमोर सादर केला होता.
advertisement

महायुतीचे नेते कधी जाणार दिल्लीला?

महायुती सरकार स्थापनेत खातेवाटप हा कळीचा मुद्दा ठरला असल्याचे म्हटले जात आहे. दिल्लीत महाराष्ट्राच्या खातेवाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत पुन्हा बैठक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासांत खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्याचे म्हटले जात आहे. महायुतीच्या नेत्यांचा कोणत्याही क्षणी दिल्ली दौरा होण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Govt Formation : महायुतीच्या नेत्यांची पुन्हा दिल्लीवारी! अमित शाहांसोबत बैठकीची शक्यता, कारण काय?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement