Maharashtra Govt Formation : खाते वाटपावरून एकनाथ शिंदे नाराज? निकटवर्तीय आमदाराने स्पष्ट सांगितले...
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Mahayuti Govt Formation : खाते वाटपाच्या मुद्यावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. या नाराजीतून एकनाथ शिंदे हे आपल्या मूळ गावी गेल्याची चर्चा आहे. मा
नितीन नांदूरकर, प्रतिनिधी, जळगाव: निवडणुकीत बहुमत मिळून देखीलही महायुतीमध्ये सत्ता स्थापनेचा घोळ सुरू असल्याची चर्चा आहे. तर, दुसरीकडे या सगळ्या घडामोडीत भाजपने गटनेत्याच्या निवडीआधीच शपथविधीची तारीख जाहीर केली. तर, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील आपल्या मूळ गावी दाखल झाले आहेत. खाते वाटपाच्या मुद्यावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. या नाराजीतून एकनाथ शिंदे हे आपल्या मूळ गावी गेल्याची चर्चा आहे. मात्र, दुसरीकडे शिंदे गटाचे नवनिर्वाचित आमदार गुलाबराव पाटील यांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
जळगावमध्ये बोलताना गुलाबराव पाटील यांनी म्हटले की, मुख्यमंत्री कोण हा शेवटी भाजप नेतृत्वाचा हा विषय आहे. एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका आधीच स्पष्ट करत आमची काहीही अडचण होणार नसल्याचे स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह जो निर्णय घेतील त्या निर्णयाला माझा शंभर टक्के पाठिंबा असेल असे एकनाथ शिंदे साहेबांनी आधीच सांगितलं असल्याचे त्यांनी म्हटले.
advertisement
एकनाथ शिंदे नाराज आहेत? गुलाबराव पाटील म्हणतात...
एकनाथ शिंदे हे नाराज आहेत का, यावर बोलताना गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, ते बिलकुल नाराज नाहीत. एकनाथ शिंदे साहेब हे रसायन आहे. नाराज हा त्यांच्या जीवनातला कधी शब्द नाही. फार खडतर प्रवास त्यांनी यापूर्वी केलेला आहे. अडीच वर्षांमध्ये लोकांनी त्यांना जे प्रेम दिलेला आहे त्यामुळे ते नाराज राहण्याचा प्रश्नच येत नाही असेही गुलाबराव पाटील म्हणाले.
advertisement
गृहमंत्री शिवसेनेला मिळणार?
गुलाबराव पाटील यांनी म्हटले की, खाते मागणं ही कुठली चुकीची गोष्ट नाही. महायुतीमध्ये तिघेजण आहेत, त्यामुळे वाटणी करावी लागेल. पण, त्यामुळे हे खातं हवंय त्याची मागणीच करू नये असा त्याचा अर्थ होत नाही, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार आजारी...
गुलाबराव पाटील यांनी म्हटले की, जवळपास 50 टक्के आमदार हे आजारी आहेत. घशाचे इंफेक्शन आणि ताप हे बऱ्याचशा आमदारांना झालं आहे. मी सुद्धा सहा ते सात सलाईन मुंबईमध्ये घेतल्या आहेत. मात्र, त्यांना जरी ताप असला तरीदेखील एकनाथ शिंदे हे मुंबईतील बैठकीत हजर राहतील असेही गुलाबराव पाटलांनी सांगितले.
advertisement
इतर संबंधित बातमी :
view comments
Location :
Jalgaon,Jalgaon,Maharashtra
First Published :
December 01, 2024 10:57 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Govt Formation : खाते वाटपावरून एकनाथ शिंदे नाराज? निकटवर्तीय आमदाराने स्पष्ट सांगितले...


