Divorce: महाराष्ट्रातील 3 शहरं, जिथे होतात सर्वाधिक घटस्फोट, धक्कादायक आकडेवारी समोर
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Vrushali Kedar
Last Updated:
Divorce: 18 ते 44 वयोगटातील लोकांमध्ये घटस्फोटांचं प्रमाण सर्वाधिक आहे.
पुणे: भारतीय संस्कृतीत लग्नाला विशेष महत्त्व आहे. लग्नात पती-पत्नी एकमेकांना सात जन्म एकत्र राहण्याचं वचन देतात. संपूर्ण जगात भारतीय कुटुंब व्यवस्था आदर्श मानली जाते आणि देशात घटस्फोटाचं प्रमाण अवघे 1.1 टक्का आहे. मात्र, याबाबत महाराष्ट्रातील परिस्थिती चिंताजनक असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रात गेल्या आठ-दहा वर्षांत घटस्फोटाचं प्रमाण 18.7 टक्क्यांपर्यंत वाढलं आहे. विशेषत: मुंबई, पुणे आणि नागपूरसारख्या शहरांमध्ये हे प्रमाण 30 टक्क्यांपर्यंत पोहोचलं आहे. घटस्फोटाचं प्रमाण का वाढत आहे? याबद्दल अॅडव्होकेट गायत्री कांबळे यांनी लोकल 18 शी बोलताना माहिती दिली.
अॅडव्होकेट गायत्री कांबळे यांनी सांगितलं की, घटस्फोट होण्यामागे अनेक कारणं आहेत. बदलती जीवनशैली, वाढत्या अपेक्षा, कुटुंबातील ताण-तणाव आणि अहंकार या सगळ्या गोष्टींमुळे घटस्फोटाचं प्रमाण वाढताना दिसत आहे.
ऐन उमेदीच्या काळात घटस्फोट होण्याचं प्रमाण वाढलं
गायत्री कांबळे यांनी सांगितल्यानुसार, 18 ते 44 वयोगटातील लोकांमध्ये घटस्फोटांचं प्रमाण सर्वाधिक असून, हे तब्बल 78 टक्क्यांपर्यंत पोहचलं आहे. विशेषत: मुंबई, पुणे आणि नागपूरसारख्या महानगरांमध्ये घटस्फोटांचे प्रमाण 30 टक्क्यांपर्यंत वाढलं आहे. दोन्ही नोकरी करणाऱ्या किंवा कमाई करणाऱ्या जोडप्यांमध्येही घटस्फोटांचा प्रमाण लक्षणीय आहे. आकडेवारीनुसार, घटस्फोटासाठी पुढाकार घेणाऱ्यांपैकी 56.2 टक्के पुरुष तर 43.8 टक्के महिला आहेत.
advertisement
देशातील घटस्फोटांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
देशात देखील आता घटस्फोटांचं प्रमाण वाढत असून, महाराष्ट्र आघाडीवर आहे. महाराष्ट्रात घटस्फोटाचं प्रमाण 18.7 टक्के आहे. कर्नाटक (11.7टक्के), उत्तर प्रदेश (8.8 टक्के), पश्चिम बंगाल (8.2 टक्के) आणि दिल्ली (7.7 टक्के) ही इतर उच्च प्रमाण असलेली राज्ये आहेत. तामिळनाडू (7.1 टक्के), तेलंगणा (6.7 टक्के), केरळ (6.6 टक्के), बिहार (3.2 टक्के) आणि मध्य प्रदेश (3.0 टक्के) ही राज्यांमध्ये देखील घटस्फोटांचं प्रमाण वाढत आहे.
advertisement
'एडजुआ लीगल्स गुगल ॲनालिटिक 2025’च्या अहवालानुसार दिल्ली, मुंबई, बंगळुरू, कोलकाता, लखनौ, हैदराबाद यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये अलीकडील वर्षांत घटस्फोटाच्या अर्जांची संख्या 3 पटीने वाढली आहे. ‘कम्प्युटर्स इन ह्यूमन बिहेवियर’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झालं आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Sep 30, 2025 4:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Divorce: महाराष्ट्रातील 3 शहरं, जिथे होतात सर्वाधिक घटस्फोट, धक्कादायक आकडेवारी समोर








