'देख रहा है बिनोद' कार्यकर्ते शेवटी 'कढीपत्ता'; नेत्यांच्या बायका,भावयजाया मैदानात, कुठे मिळाली नातेवाईकांना उमेदवारी?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
नगरपरिषद, नगर पंचायतीच्या निवडणुकीत अनेक उमदेवार हे मंत्री संत्री, आजी माजी आमदार खासदारांचे नातेवाईकच दिसतात. त्यामुळं आयुष्यभर केवळ संतरज्याच उचलायच्या का असा प्रश्न कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांची (Local Body Election) निवडणूक ही तळागाळतल्या कार्यकर्त्यांची निवडणूक आहे असं म्हंटलं जायचं. लोकसभा असो किंवा विधानसभा, आपल्या नेत्याला निवडून आणण्यासाठी कार्यकर्ते दिवसरात्र जंग जंग पछाडून, रक्ताचं पाणी करतात. स्थानिक स्वराज्य संस्थेतून राजकीय प्रवास सुरू होईल ऐवढी अपेक्षा कार्यकर्त्यांना असते. मात्र कार्यकर्त्यांच्या या आशेवर त्यांचेच नेते पाणी फिरवत असल्याचं बोललं जाऊ लागलंय. याच कारण नगरपरिषद, नगर पंचायतीच्या निवडणुकीत अनेक उमदेवार हे मंत्री संत्री, आजी माजी आमदार खासदारांचे नातेवाईकच दिसतात. त्यामुळं आयुष्यभर केवळ संतरज्याच उचलायच्या का असा प्रश्न कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे
कोणत्या नेत्यांच्या नातवाईकांना उमेदवारी?
मंत्री गिरीश महाजन (जामनेर नगरपरिषद)
मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज भरला. जामनेरच्या नगराध्यक्ष असलेल्या तीन ट्रम्प हॅट्रिक असलेल्या साधना महाजन यांनी आज आपला उमेदवारी अर्ज पुन्हा भरला आहे राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर राज्यभराची निवडणुकीची जबाबदारी असली तरी त्यांच्या पत्नी ह्या पुन्हा एकदा जामनेर नगराध्यक्षसाठी आपला उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केला आहे
advertisement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (चिखलदरा नगरपरिषद)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत मामेभाऊ आल्हाद कलोती हे चिखलदरा नगरपालिकेच्या नगरसेवक पदाकरिता उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पहिल्यांदाच ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे
राज्यमंत्री इंद्रनील नाईक (पुसद नगरपरिषद)
पुसद नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. राज्यमंत्री इंद्रनील नाईक तसेच असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थित त्यांनी अर्ज दाखल केला
advertisement
मंत्री आकाश फुंडकर (खामगाव नगरपरिषद)
भाजपने खामगाव नगरपालिकेत स्वबळाचा नारा देत कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्या वहिनी अपर्णा फुंडकर यांना उमेदवारी दिली आहे. खामगाव नगरपालिकेत भाजपने एकला चलोरेचा नारा दिला आहे.
माजी सभापती (वि.प.) रामराजे निंबाळकर (फलटण नगरपरिषद)
रामराजे निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेतराजे नाईक निंबाळकर धनुष्यबाणाच्या चिन्हावर फलटण नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार आहेत. रामराजे सध्या राष्ट्रवादीत असून त्यांचे चिरंजीव मात्र धनुष्यबाणावर निवडणूक लढवणार आहे.
advertisement
मंत्री संजय सावकारे ( भुसावळ नगरपरिषद)
भुसावळमध्ये वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात उतरल्या आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपच्या वतीने भुसावळमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले आहे.
शिवसेना आमदार किशोर पाटील (पाचोरा नगरपरिषद)
शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील यांनी पाचोरा शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज हा दाखल केला आहे. दरम्यान नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपलाच विजय होईल, असा विश्वास आमदार किशोर पाटील व त्यांच्या पत्नी सुनीता पाटील यांनी व्यक्त केला आहे.
advertisement
शिवसेना आमदार संजय गायकवाड (बुलढाणा नगरपरिषद)
शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा गायकवाड यांनी बुलढाणा नगरपरिषदेसाठी अर्ज दाखस केला आहे.
भाजप आमदार मंगेश चव्हाण ( चाळीसगाव नगरपरिषद)
जळगावच्या चाळीसगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने एकला चलोचा नारा दिला आहे. आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रतिभा चव्हाण या भाजपाच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार असणार आहे.
advertisement
आमदार सत्यजित तांबे, (संगमनेर नगरपरिषद)
संगमनेर नगरपालीका अध्यक्षपदासाठी अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे यांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सत्यजित तांबे यांच्या पत्नी विरोधात संगमनेरचे विद्यमान आमदार अमोल खताळ यांच्या भावजईची लढत लक्षवेधी ठरणार आहे. आमदार पत्नीच्या विरोधात आमदाराची भावजई हि लढत रंगतदार ठरणार आहे..
advertisement
माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर (फलटण नगरपरिषद)
माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर याचे भाऊ समशेरसिंह निंबाळकर यांनी फलटण नगरपरिषदेसाठी अर्ज भरला आहे.
आमदार शिवसेना अमोल खताळ (संगमनेर नगरपरिषद)
हायुतीचे आमदार अमोल खताळ यांच्या भावजई सुवर्णा खताळ यांनी महायुतीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
भाजप नेते राजन पाटील (अनगर नगरपंचायत)
भाजप नेते राजन पाटील यांच्या अनगर नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी राजन पाटील यांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील यांनी भाजप कडून उमेदवारी अर्ज केला दाखल आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून उज्वला थिटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे
आमदार शिवसेना चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर नगरपरिषद)
मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मुलीने अखेर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांची कन्या संजना चंद्रकांत पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 17, 2025 10:28 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'देख रहा है बिनोद' कार्यकर्ते शेवटी 'कढीपत्ता'; नेत्यांच्या बायका,भावयजाया मैदानात, कुठे मिळाली नातेवाईकांना उमेदवारी?


