भाजपची सत्ता किती महापालिकांवर, ठाकरे, काँग्रेसचं काय? पाहा २९ महापालिकांच्या निकालाचं संपूर्ण गणित!

Last Updated:

Maharashtra Municipal Election : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल हाती आले असून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे.

भाजपची सत्ता किती महापालिकांवर, ठाकरे, काँग्रेसचं काय? पाहा २९ महापालिकांच्या निकालाचं संपूर्ण गणित!
भाजपची सत्ता किती महापालिकांवर, ठाकरे, काँग्रेसचं काय? पाहा २९ महापालिकांच्या निकालाचं संपूर्ण गणित!
मुंबई: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल हाती आले असून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) एकहाती वर्चस्व गाजवत विरोधकांना धूळ चारली आहे. मुंबईसह राज्यातील तब्बल २१ महापालिकांवर भाजपचा झेंडा फडकला असून, शिवसेना (शिंदे गट) आणि काँग्रेसला केवळ बोटावर मोजण्याइतक्याच जागांवर समाधान मानावे लागले आहे. मुंबईतील २५ वर्षांपासूनची सत्ता शिवसेनेला गमवावी लागली आहे.

भाजपचा २१ महापालिकांत 'महा-विजय'

राज्यात सध्या भाजपची लाट असल्याचे निकाल, मतमोजणीच्या कलावरून स्पष्ट होत आहे. मुंबईसारख्या महत्त्वाच्या महापालिकेसह पुणे, नागपूर आणि नाशिक या मोठ्या शहरांमध्येही भाजपने आपली सत्ता कायम राखली आहे.
भाजपची सत्ता असलेल्या महापालिका: मुंबई, नवी मुंबई, मीरा भाईंदर, उल्हासनगर, पनवेल, पुणे, पिंपरी चिंचवड, इचलकरंजी, सांगली मिरज कुपवाड, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, अकोला, अमरावती, नाशिक, धुळे, जळगांव, अहिल्यानगर (अहमदनगर), जालना, नांदेड वाघाळा आणि छत्रपती संभाजीनगर.
advertisement

ठाणे आणि कल्याणमध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला शाबूत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ठाणे आणि कल्याण-डोंबिवली या आपल्या हक्काच्या बालेकिल्ल्यांमध्ये वर्चस्व टिकवून ठेवले आहे. या दोन महत्त्वाच्या महापालिकांवर शिवसेनेचा भगवा कायम आहे.

काँग्रेस आणि ठाकरे गटाची स्थिती काय?

काँग्रेस: काँग्रेसला केवळ ३ महापालिकांमध्ये यश मिळाले आहे. यामध्ये लातूर आणि भिवंडी निजामपूरमध्ये त्यांनी स्वबळावर, तर चंद्रपूरमध्ये शिवसेना (UBT) च्या साथीने सत्ता स्थापन केली आहे.
advertisement
शिवसेना ठाकरे गट: उद्धव ठाकरे यांच्या गटाला परभणीमध्ये यश मिळाले आहे, तिथे त्यांनी काँग्रेसच्या पाठिंब्याने सत्ता मिळवली आहे.
बविआ: बहुजन विकास आघाडीने आपलं अस्तित्व टिकवत वसई-विरार महापालिकेवर पुन्हा एकदा पकड मजबूत केली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला होता. त्यानंतर ही महापालिका निवडणूक बहुजन विकास आघाडीसाठी महत्त्वाची होती.
advertisement

मालेगावमध्ये अपक्षांचा 'किंगमेकर' रोल

मालेगाव महानगरपालिकेचा निकाल मात्र पेचात अडकला आहे. येथे कोणत्याही प्रमुख पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे सत्तेच्या चाव्या आता अपक्षांच्या हाती असून, ते कोणाला पाठिंबा देतात यावर मालेगावचा महापौर ठरणार आहे.
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भाजपची सत्ता किती महापालिकांवर, ठाकरे, काँग्रेसचं काय? पाहा २९ महापालिकांच्या निकालाचं संपूर्ण गणित!
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement