खाकी वर्दीचं स्वप्न पूर्ण होणार, पोलीस भरतीची जाहिरात निघाली; नोकरभरतीची सर्व A To Z माहिती बातमीमध्ये
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
खाकी वर्दीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. राज्यामध्ये हजारो जागांसाठी विविध जिल्ह्यांमध्ये पोलीस शिपाई पदांची भरती सुरु झाली आहे.
अनेकांचं खाकी वर्दीचं स्वप्न असतं. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवाचं रान करून आपलं स्वप्न पूर्ण करतात. खाकी वर्दीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. राज्यामध्ये हजारो जागांसाठी विविध जिल्ह्यांमध्ये पोलीस शिपाई पदांची भरती सुरु झाली आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून भरती प्रक्रियेत प्रथम 50 गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा आणि त्यानंतर 100 गुणांची लेखी परीक्षा होणार आहे. कोण कोणत्या पदांसाठी ही नोकर भरती होणार आहे आणि कोणकोणत्या विभागामध्ये किती पदे भरले जाणार आहेत. जाणून घेऊया...
पोलिस दलामध्ये काम करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरूण- तरूणींच्या कामाची बातमी आहे. राज्य सरकाराने 29 ऑक्टोबरपासून पोलीस दलात एकूण 15 हजारांहून अधिक रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती प्रक्रिया इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी घेऊन आली आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे, त्यामुळे इच्छुकांनी त्यापूर्वी आपले अर्ज सादर करणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, 2020 ते 2025 या कालावधीमध्ये ज्या उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडली आहे, त्यांना सुद्धा भरती प्रक्रियेत अर्ज करण्याची अखेरची संधी देण्यात आली आहे.
advertisement
त्यामुळे, वयोमर्यादेमुळे वंचित राहिलेल्या उमेदवारांना आता पोलीस दलात रूजू होण्याची पुन्हा एक संधी मिळाली आहे. उमेदवारांनी तपशीलवार माहितीसाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरातीची PDF एकदा तरी आवश्य वाचावी. अर्ज करण्यासाठीची लिंक आणि जाहिरातीची PDF ची लिंक बातमीमध्ये देण्यात आली आहे.
पदाचे नाव आणि रिक्त पदांची संख्या
- पोलीस शिपाई - 12624
- पोलीस शिपाई-वाहन चालक - 515
- पोलीस बॅन्डस्मन - 113
- पोलीस शिपाई-SRPF - 1566
- कारागृह शिपाई - 554
advertisement
ऑनलाईन अर्ज कसा करावा?
- सर्वात पहिले https://www.mahapolice.gov.in/ या पोर्टलला भेट द्या.
- यानंतर "अद्ययावत माहिती" नावाचा एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- त्यावर "पोलीस शिपाई भरती २०२४-२५, माहिती" नावाचा एक पर्याय दिसेल.
- त्या पर्यायाला क्लिक केल्यानंतरं अर्जदारांना जाहिरातीचा एक पर्याय दिसेल, त्याप्रमाणे जाहिरात तुम्ही वाचू शकता
- किंवा https://policerecruitment2025.mahait.org/Forms/Advertisement.aspx या दिलेल्या लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही जाहिरात पाहू शकता.
- आता पुढची पायरी आहे, अर्ज भरण्याची. वेगवेगळ्या जाहिरातींच्या खाली "ऑनलाईन अर्ज प्रणाली" नावाचा पर्याय दिसेल.
- त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला "नवीन नोंदणी करा" असा एक पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.
- तुमचा आधार क्रमांक नमूद करून आधारशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावरील आलेला OTP टाकून मोबाईल नंबर पडताळून घ्या.
- आधार पडताळणीसाठी आलेला OTP हा 180 सेकंद वैध राहील, दिलेल्या वेळात OTP तपासणी न झाल्यास अर्जदारास पुन्हा आधार पडताळणी प्रक्रिया करावी लागेल.
- तुमच्या ई-मेल आयडी वर आणखी एकदा पडताळणीसाठी लिंक पाठवला जाईल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही मुख्य पृष्ठावर पोहोचाल. आता ई मेल आयडी आणि पासवर्डचा वापर करून लॉग इन करा आणि परीक्षेसाठी अर्ज करा.
advertisement
ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख आणि वेळ - 29 ऑक्टोबर 2025 संध्याकाळी 6 वाजल्यापासून
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि वेळ - 30 नोव्हेंबर 2025, रात्री 11.59 वाजेपर्यंत
संपूर्ण राज्यभर सर्व पोलीस घटकात एका पदासाठी एकाच दिवशी लेखी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज भरताना ही बाब विचारात घेऊनच अर्ज भरावा. उमेदवार एका पदासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करु शकतो. एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात येतील. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातांचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना / पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरावा.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
November 02, 2025 4:47 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
खाकी वर्दीचं स्वप्न पूर्ण होणार, पोलीस भरतीची जाहिरात निघाली; नोकरभरतीची सर्व A To Z माहिती बातमीमध्ये


