बिनविरोध निवडीवरून राजकारण तापलं, मनसेने थेट हायकोर्टाचं दार ठोठावलं; केली मोठी मागणी
- Reported by:PRASHANT BAG
- Published by:Prachi Amale
Last Updated:
बिनविरोध निवडीवरून राजकारण तापलं असून विरोधकांनी यावर सवाल उपस्थित केला आहे.
मुंबई : राज्यात महानगरपालिका निवडणुकांमध्ये बिनविरोध निवडून आलेल्यांमध्ये सत्ताधारी महायुतीच्या उमेदवारांचा सर्वात जास्त टक्का आहे. अनेक ठिकाणी विरोधी पक्षातील उमेदवारी अर्ज मागे घेतले तरी काही ठिकाणी उमेदवारांचे अर्ज बाद ठरल्यामुळं उमेदवारांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. या बिनविरोध निवडीवरून राजकारण तापलं असून विरोधकांनी यावर सवाल उपस्थित केला आहे. दरम्यान मनसे आणि काँग्रेसने या निवडीवर सवाल उपस्थित करत थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
राज्यातील महानगरपालिक निवडणुकीअगोदर बिनविरोध निवडणुकीविरोधात मनसे नेते अविनाश जाधव आणि काँग्रेसचे समीर गांधी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उमेदवारी मागे घेणाऱ्या उमेदवारांना पैसे देऊन आणि दबाव टाकून उमेदवारी मागे घ्यायला भाग पडल्याचा दावा याचिकेत केला आहे. तसेच बिनविरोध संकल्पना लोकप्रतिनिधी कायद्यात नाही असाही दावा याचिकेत केला आहे.
याचिकेत काय दावा केला आहे?
advertisement
लोकप्रतिनिधी कायद्यात निवडून आलेले लोकप्रतिनिधी असा स्पष्ट उल्लेख असून बिनविरोध विजयी उमेदवारांना पडलेल्या मतांची किमान टक्केवारी निश्चित करण्याची मागणी याचिकेत केली आहे. निवडणूक आयोगाच्या पक्षपातीपणावर बोट ठेवत निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवरच याचिकेतून सवाल केला आहे. निवडणूक आयोग राज्य सरकारच्या दबावाखाली असल्याचा याचिकेत दावा केला आहे.
रिट याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घेण्याची मागणी
advertisement
उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी केली असून चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध निवडणुकीचे निकाल जाहीर न करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने द्यावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. रिट याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घेण्याची करणार मागणी केली आहे.
कुठे कुठे निवडून आले उमेदवार?
कल्याण डोंबिवलीत महायुतीचे सर्वाधिक 22 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. यात भाजपच्या 15 तर
advertisement
शिवसेनेच्या 7 उमेदवारांचा समावेश आहे.जळगावमध्ये 12 जण बिनविरोध झालेत, त्यात भाजप आणि शिवसेनेचे
प्रत्येकी 6 -6 उमेदवार बिनविरोध विजयी झालेत. भिवंडीत भाजपचे सहा तर शिवसेनेचे दोन असे आठ उमेदवार बिनविरोध विजयी झालेत.तर ठाण्यात शिवसनेचे सात ,पनवेलमध्ये भाजपचे सहा तर अपक्ष एक असे सात उमेदवार बिनविरोध झालेत.अहिल्यानगरमध्ये भाजपचे तीन तर राष्ट्रवादीचे दोन असे पाच उमेदवार विजयी झाले.धुळ्यात भाजपचे भाजपचे चार उमेदवार विजयी झालेत. तर पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्येभाजपचे प्रत्येकी दोन उमेदवार विजयी झाले आहेत मालेगावमध्ये इस्लामिक पार्टीचा एक उमेदवार विजयी झाला आहे.
advertisement
हे ही वाचा :
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 05, 2026 4:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बिनविरोध निवडीवरून राजकारण तापलं, मनसेने थेट हायकोर्टाचं दार ठोठावलं; केली मोठी मागणी








