Maharashtra SSC Board Exam 2024 : दहावीची परीक्षा आजपासून, विद्यार्थ्यांना मिळणार 10 मिनिटांचा अतिरिक्त वेळ
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
एकूण 9 विभागांमध्ये ही परीक्षा होईल. विद्यार्थ्यांना या परीक्षेला जाताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे.
मुंबई : राज्यात आजपासून दहावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे ही परीक्षा घेतली जाते. आजपासून या परीक्षेला सुरुवात झाली आहे. एकूण 9 विभागांमध्ये ही परीक्षा होईल. विद्यार्थ्यांना या परीक्षेला जाताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे.
पुणे बोर्डाकडून मिळालेल्या माहितीनुसार 16,09,445 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. ही परीक्षा एकूण 5 हजार 86 केंद्रांवर घेण्यात येणार आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागांमध्ये ही परीक्षा घेतली जात आहे. दोन पेपरच्यामध्ये विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा
परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी अतिरिक्त मिनिटे यंदा दिली जाणार नाहीत. विद्यार्थ्यांना शेवटी प्रश्नपत्रिका पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त 10 मिनिटे मिळणार आहेत. गेल्या वर्षी प्रमाणेच यंदाही 10 मिनिटं वाढवून देण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
advertisement
दुसरीकडे CBSE नववी ते बारावीसाठी ओपन बुक परीक्षा पद्धतीचा वापर करण्याबाबत हालचाली सुरु केल्या आहेत. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. त्याच धर्तीवर राज्य मंडळाकडून येत्या काळात ओपन बुक परीक्षा पद्धतीचा वापर करण्याबाबत विचार केला जाणार आहे. ओपन बुक परीक्षा पद्धतीमध्ये परीक्षेवेळी विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरं लिहिण्यासाठी पाठ्यपुस्तकं, मार्गदर्शक साहित्यांचा वापर करण्याची मुभा असते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 01, 2024 11:09 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra SSC Board Exam 2024 : दहावीची परीक्षा आजपासून, विद्यार्थ्यांना मिळणार 10 मिनिटांचा अतिरिक्त वेळ


