नवरात्रीला देवीच्या नैवेद्यासाठी सोपी आणि चवदार रेसिपी, झटपट बनवा सोयाबीनच्या दाण्याचा झुणका
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
नवरात्रीमध्ये देवीला पारंपरिक नैवद्य दाखवायचा आहे. पण, नेमकं काय बनवाव हे कळतं नाहीये. तर अशावेळी तुम्ही सोयाबीनच्या दाण्याचा झुणका आणि भाकरी बनवू शकता.
नवरात्रीमध्ये देवीला पारंपरिक नैवद्य दाखवायचा आहे. पण, नेमकं काय बनवाव हे कळतं नाहीये. तर अशावेळी तुम्ही सोयाबीनच्या दाण्याचा झुणका आणि भाकरी बनवू शकता. अगदी कमीतकमी वेळात तयार होणारा पदार्थ आहे. आता बाजारात सोयाबीनचे दाणे देखील उपलब्ध आहेत. अगदी घरगुती साहित्य वापरून तुम्ही देवीला पारंपरिक नैवद्य दाखवू शकता. पारंपारिक नैवेद्यासाठी सोयाबीनच्या दाण्याचा झुणका कसा बनवायचा? याची रेसिपी अमरावतीच्या गृहिणी मंदा बहुरूपी यांनी दिली आहे.
झुणका बनविण्यासाठी लागणारे साहित्य:- सोयाबीनचे दाणे भाजून घेतलेले, तेल, जिरे, हिरवी मिरची, कांदा, कडीपत्ता, लाल तिखट, हळद, धनिया पावडर, मीठ, टोमॅटो आणि कोथिंबीर हे साहित्य लागेल. सोयाबीनच्या दाण्याचा झुणका बनविण्याची कृती:- सर्वात आधी दाणे बारीक करून घ्यायचे आहे. यासाठी तुम्ही मिक्सर किंवा शकतं असल्यास पाट्यावर देखील वाटून घेऊ शकता. त्यांनतर कढईमध्ये तेल टाकून घ्यायचे आहे. तेल थोडे गरम झाले की, जिरे टाकून घ्यायचे आहे. त्यांनंतर कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा शिजत असताना कडीपत्ता देखील टाकून घेऊ शकता.
advertisement
कांदा लालसर होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. कांदा लालसर झाला की, त्यात लाल तिखट, हळद, मीठ हे सर्व टाकून घ्यायच आहे. 2 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यात टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. त्याला सुद्धा 5 मिनिट शिजवून घ्यायच आहे. नंतर त्यात बारीक केलेले सोयाबीनचे दाणे टाकून घ्यायचे आहे. सर्व मसाल्यात दाणे मिक्स करून घेतल्यानंतर 10 मिनिट शिजवून घ्यायचे आहे.दहा मिनिटांनंतर झुणका तयार झालेला असेल. त्यात कोथिंबीर टाकून घ्यायचा आणि नैवद्यसाठी ताट तयार करून घ्यायचं. त्यामध्ये झुणका, भाकरी, गूळ, तूप, मीठ आणि हिरवी मिरची ठेवायची आहे. त्यांनतर तुम्ही तो नैवद्य देवीला दाखवू शकता.
Location :
Maharashtra
First Published :
September 22, 2025 6:55 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नवरात्रीला देवीच्या नैवेद्यासाठी सोपी आणि चवदार रेसिपी, झटपट बनवा सोयाबीनच्या दाण्याचा झुणका