Pune Rain News : पुणे जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट, प्रशासनाने पुढील तीन तास या जिल्ह्यांना दिला अलर्ट

Last Updated:

Pune Rain Latest News : महाराष्ट्रामध्ये अनेक भागांमध्ये गेल्या दोन- तीन दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. मुंबई, ठाणे, पुणे, छत्रपती संभाजीनगरसह इतरत्र भागातही पावस जोरदार कोसळत आहे.

Pune Rain News : पुणे जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट, प्रशासनाने पुढील तीन तास या जिल्ह्यांना दिला अलर्ट
Pune Rain News : पुणे जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट, प्रशासनाने पुढील तीन तास या जिल्ह्यांना दिला अलर्ट
महाराष्ट्रामध्ये अनेक भागांमध्ये गेल्या दोन- तीन दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. मुंबई, ठाणे, पुणे, छत्रपती संभाजीनगरसह इतरत्र भागातही पावस जोरदार कोसळत आहे. 22 सप्टेंबर म्हणजेच आज घटस्थापनेच्या दिवशी मुसळधार पाऊस कोसळणार अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. त्या प्रमाणे अनेक ठिकाणी पाऊसाने जोरदार हजेरी लावली होती. आता पुढच्या काही तासांतील प्रमुख जिल्ह्यातील पावसाची अपडेट समोर आली आहे.
हवामान विभागाने पुढील तीन तासांमधील पावसाबद्दलची अपडेट शेअर केली आहे. पुढच्या तीन तासांसाठी पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. शिवाय, पुढील तीन तासांमध्ये शहरामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना असे आवाहनही हवामान विभागाने केले. पुढील 3 तासात पुणे , सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, बीड या जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मध्यम ते जोरदार पाऊस आणि ताशी 30- 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
advertisement
पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या रेकॉर्ड ब्रेक पावसामुळे पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. मुंबई शहराबद्दल सांगायचे तर, मुंबई शहराला तर, पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. मुंबई महानगर पालिकेने शहर आणि उपनगरातील हवामानाबद्दल सांगितले की, अनेक ठिकाणी ढगाळ आकाश आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. शिवाय, 30- 40 किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहण्यासह वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pune Rain News : पुणे जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट, प्रशासनाने पुढील तीन तास या जिल्ह्यांना दिला अलर्ट
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement