Malegaon Girl Murder: मालेगाव चिमुरडी अत्याचार आणि हत्या प्रकरणी कोर्टातून मोठी अपडेट, आरोपीची हुशारी पण घडलं उलटचं!
- Published by:Sachin S
Last Updated:
आरोपी विजय खैरनारला आज मालेगावच्या अप्पर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार होतं. पण आरोपीला कोर्टात हजर करण्याची माहिती मिळताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
मालेगाव: नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये एका ३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी घडामोडींना वेग आला आहे. या प्रकरणी चौथ्या दिवशीही मालेगावकरांनी बंद पुकारला होता. या प्रकरणातील आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार होतं. त्यामुळे गावकऱ्यांनी कोर्टाच्या परिसरात तुफान गर्दी केली होती. अखेरीस मोठ्या बंदोबस्तात या नराधमांना कोर्टासमोर हजर केलं, त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अवघ्या महाराष्ट्राला हादरावून सोडणाऱ्या मालेगाव ३ वर्षांच्या चिमुरडी अत्याचार आणि हत्या प्रकरणी मालेगावमध्ये चौथ्या दिवशीही गावकऱ्यांची तीव्र संतापाची लाट आहे. आरोपी विजय खैरनारला आज मालेगावच्या अप्पर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार होतं. पण आरोपीला कोर्टात हजर करण्याची माहिती मिळताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आरोपीला आमच्या हवाली करा, अशी घोषणाबाजी करत महिलांनी कोर्टाचा परिसर दणाणून सोडला. गर्दीमुळे कोर्टाचे दोन्ही गेट बंद करण्यात आले होते. नागरिकांमध्ये निर्माण झालेला रोष पाहून आरोपीला कोर्टात हजर करणे कठीण झाले. अखेरीस व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आरोपीला हजर करण्यात आलं.
advertisement
कोर्टात काय घडलं?
आज कोर्टामध्ये आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी तपास अधिकाऱ्यांनी केली होती. आरोपीलाा न्यायालयात हजर करणार होते. पण, संपूर्ण तालुक्यामधून मोठ्या संख्येनं लोकांनी गर्दी केली होती. लोकांनी तुफान गर्दी केली होती. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तपास अधिकाऱ्यांनी आरोपीला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कोर्टात हजर करण्यात यावे अशी मागणी पत्राद्वारे केली होती. कोर्टाने मागणी मंजूर केली आणि व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी झाली. रिमांड रिपोर्ट सादर केला होता.
advertisement
आरोपीने चिमुरडीचा खून एका हत्याराने केला आहे. मागील चार दिवसांच्या कोठडीमध्ये आरोपीने ते हत्यार काढून दिलं नाही. चौकशी दरम्यान त्याने कोणतंही सहकार्य केलं नाही. म्हणून रिकव्हरीचं ग्राऊंड होतं. पीडित मुलीचं अपहरण करण्यामध्ये कुणी त्याला मदत केली, आणखी कुणी सहकार्य केलंय का? त्यामुळे आरोपीची पोलीस कोठडी मागण्यात आली आहे. तसंच वैद्यकीय तपास अधिकाऱ्यांना या प्रकरणात तपास करायचा आहे. या घटनेत कुणी प्रत्यक्षदर्शी आहे, त्यांचा जबाब नोंदवायचा आहे. त्यामुळे आरोपीला २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
advertisement
आरोपीनं काय मागणी केली?
आरोपी विजय खैरनार याने न्यायालयामध्ये अर्ज केला होता. शासकीय खर्चाने मला वकील देण्यात यावा, अशी मागणी केली होती. पण, आरोपीचं कृत्य पाहत मालेगाव वकिल संघाने वकिलपत्र न घेण्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे त्याची मागणी फेटाळण्यात आली. एवढंच नाहीतर मानसिक रुग्ण असल्याचा बनावही केला, पण तो वैद्यकीय तपासणीमध्ये फीट असल्याचं समोर आलं.
advertisement
आरोपीचं आरोपपत्र कुणीचं घेतलं नाही!
view commentsन्यायालयात हजर केल्यानंतर सरकारी वकिल संजय सोनवणे यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर कोर्टाने बाजू ऐकून घेत आरोपी विजय खैरनारला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी विजय खैरनारच्या सैतानी कृत्यामुळे कोर्टात कोणत्याही वकिलांनी त्याचं वकील पत्र घेतलं नाही, त्याने वकिलाची मागणी केली होती, पण सगळ्यांनी नकार दिला, असं एॅड. सोनवणे यांनी सांगितलं.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
November 20, 2025 6:46 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Malegaon Girl Murder: मालेगाव चिमुरडी अत्याचार आणि हत्या प्रकरणी कोर्टातून मोठी अपडेट, आरोपीची हुशारी पण घडलं उलटचं!


