शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, तुमची आरती करायची का? मविआ आक्रमक, मालवणमध्ये आंदोलन

Last Updated:

Malvan Shivaji Maharaj Statue Collapse : आज मालवण मध्ये महाविकास आघाडीच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी शिवसैनिक आता जमा व्हायला सुरुवात झाली आहे.

News18
News18
ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी
मालवण : राजकोट येथील पुतळा प्रकरणानंतर महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे.आज मालवण मध्ये महाविकास आघाडीच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी शिवसैनिक आता जमा व्हायला सुरुवात झाली आहे. मालवण बस स्टॅन्ड पासून या मोर्चाला सुरुवात होणार असून तहसीलदार कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार आहे. आदित्य ठाकरे यांच्यासह विजय वडेट्टीवार आंबादास दानवे, जयंत पाटील यांचा यात सहभाग आहे. (Malvan Shivaji Maharaj Statue Collapse)
advertisement
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या निषेधार्थ मालवणमध्ये उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला आहे. दुकाने उघडण्याच्या वेळेतही अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने पूर्ण बंद आहेत. एकही दुकान न उघडल्याने बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून पुतळा पडल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढला जात आहे.
advertisement
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुतळा पडल्याच्या मुद्द्यावरून सरकारवर नाराजी व्यक्त केली. डिसेंबरमध्ये मी पत्र लिहिलं होतं की, पुतळा जसा हवा तसा नाहीय. परवानगी दिली होती का यांसारखे प्रश्न पुढे आले आहेत. यापुढे घाई गडबड न करता काम कसं चांगलं करता येईल पहावं. सरकारने ताबडतोब पावलं उचलायला हवीत. निवडणूक जवळ आहे त्या अनुषंगाने करु नका असंही संभाजीराजे म्हणाले.
advertisement
शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, आम्ही तुमची आरती करायची का?
बुधवारी सकाळी सावंतवाडी येथील शासकीय विश्रागृहावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत महायुती सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी मालवण येथे घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला. पुतळ्याचे काम सदोष होते. कामाची चौकशी व्हायला पाहिजे. पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला. वाईटातून चांगले घडेल याची अपेक्षा करणे म्हणजे दुर्दैव आहे. प्रत्येक कामात भ्रष्टाचार केला जातोय. अनेक प्रकल्प सदोष आहेत. शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर आम्ही गप्प बसून तुमची आरती करावी का असा प्रश्नही जयंत पाटील यांनी विचारला.
advertisement
पुण्यात आंदोलन 
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ आंदोलन सुरू आहे. पुण्यात काँग्रेस महाविकास आघाडी आंदोलन करत आहे. कोथरूडमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन केलं जात असून भ्रष्ट सरकार, टक्केवारी सरकार अशा घोषणा दिल्या जात आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, तुमची आरती करायची का? मविआ आक्रमक, मालवणमध्ये आंदोलन
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement