शेतकऱ्यांना पीक कर्ज न देणाऱ्या 10 बँकांना राज्य सरकारचा दणका; मॅनेजरवर गुन्हे दाखल

Last Updated:

Dharashiv : धाराशिव शहरातल्या दहा बँकांच्या मॅनेजरवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर २५ शाखा रडारवर आहेत. ५ बँकांकडून कर्जवाटप केलंच नसल्याचं समोर आलंय.

News18
News18
बालाजी निरफळ, प्रतिनिधी
धाराशिव : शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप न करणाऱ्या बँकांना राज्य सरकारने दणका दिला आहे. धाराशिव शहरातल्या दहा बँकांच्या मॅनेजरवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर २५ शाखा रडारवर आहेत. ५ बँकांकडून शून्य टक्के कर्जवाटप करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. यानंतर पालंकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी आदेश दिल्यानंतर १० बँकांच्या मॅनेजरवर कारवाई करण्यात आलीय.  राज्य शासनाने आदेश देऊन देखील बँका आदेशाला जुमानत नसल्याने ही पावले उचलण्यात आली आहेत.
advertisement
राज्य सरकारने आदेश देऊन देखील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप न करण्याऱ्या मुजोर बँकांना सरकारने दणका दिला आहे. 10 बँकेच्या शाखाधिकारी अर्थात मॅनेजरवर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे.
advertisement
शेतकऱ्यांना कर्ज मिळत नसल्याने व बँका कर्ज वाटप करीत नसल्याने पालकमंत्री डॉ सावंत यांनी आक्रमक भुमिका घेत गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी पीककर्ज वाटपाची आकडेवारी घेऊन गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही केली.  सहायक निबंधक आशाबाई कांबळे यांच्या तक्रारी नुसार भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223 (जुने 188 कलम) लोकसेवकाच्या आदेशाचे पालन न करणे प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.
advertisement
कोणत्या बँकांच्या अधिकाऱ्यांवर कारवाई
धाराशिव शहरातील बंधन बँक, डीसीबी बँक, आयडीएफसी बँक, इंनडसड, कोटक महिंद्रा बँक या 5 बँकानी 0 टक्के पीक कर्ज वाटप केले तर इंडियन बँक 14.16 टक्के, इको बँक 14.23, स्टेट बँक ऑफ इंडिया नळदुर्ग 18.55 टक्के व लोहारा शाखा 19.55 आणि बँक ऑफ महाराष्ट्र कळंब 16.49 टक्के या 10 बँकाच्या शाखाधिकारी सागर चौगुले, रणजित शिंदे, संजय शिनगारे, दुर्गाप्रसाद जोशी, तारिक अहमद, अय्यप्पा पासवान, शाम शर्मा यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास हेड कॉन्स्टेबल भागवत शेंडगे करीत आहेत.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
शेतकऱ्यांना पीक कर्ज न देणाऱ्या 10 बँकांना राज्य सरकारचा दणका; मॅनेजरवर गुन्हे दाखल
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement