Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या मेहुण्यासह 9 जणांवर तडिपारची कारवाई, कारण काय?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या मेहुण्यासह 9 जणांवर तडिपारीची कारवाई करण्यात आली आहे. जालना जिल्हा प्रशासनाने वाळू माफिया आणि गुन्हेगारांच्याविरोधात कारवाईचा बडगा उचलला आहे.
जालना: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मेहुण्यावर प्रशासनाने कारवाई केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मेहुण्यासह 9 जणांवर तडिपारीची कारवाई करण्यात आली आहे. जालना जिल्हा प्रशासनाने वाळू माफिया आणि गुन्हेगारांच्याविरोधात कारवाईचा बडगा उचलला आहे.
मनोज जरांगे यांचा मेव्हुणा विलास खेडकर याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. वाळू प्रकरणासह इतर गुन्ह्यातील नऊ आरोपींना जालनासह बीड, परभणी आणि छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. अंबड उपविभागीय न्याय दंडाधिकारी यांच्या आदेशाने तडीपारीची कारवाई केली आहे. तडीपारीची कारवाई झालेल्या आरोपींविरोधात जालन्यातल्या अंबड, घनसावंगी आणि गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे दाखल झाले आहेत.
advertisement
विलास खेडकरवर कोणत्या आरोपात कारवाई?
विलास खेडकर विरोधात अवैध वाळू वाहतूक, वाळू चोरीचे आरोप आहेत. 2021 मध्ये ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्याशिवाय, 2023 मध्ये जालन्यातील शहागड इथे बस जाळल्याप्रकरणी 307, 353 आणि 435 या कलमान्वये गुन्हा दाखल 2023 मध्ये गोदावरी नदीतून 4 लाख 81 हजार रुपयांची 100 ब्रास वाळू चोरी प्रकरणी गुन्हा खेडकर दाखल करण्यात आला आहे. पाथरवाला बुद्रुक येथे गोदावरी मधून केणी च्या साह्याने 500 ब्रास वाळू चोरी केल्याप्रकरणी गोंदी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यांमुळे यामुळे विलास खेडकर याला जालना, छत्रपती संभाजीनगर आणि परभणी या तीन जिल्ह्यातून तडिपार करण्यात आले आहे.
advertisement
जरांगे यांच्या आंदोलनात सक्रीय...
मनोज जरांगे यांच्या आंदोलनात सक्रीय असणाऱ्या सहजणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यातील 6 आरोपींवर परभणी, जालना, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे. सदर आरोपींवरती वाळू चोरी, जीवे मारण्याचा प्रयत्न, अंतरवाली सराटीच्या आंदोलनात केलेली जाळपोळ यासह सरकारी कामात अडथळा आणण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे गुन्हे 2019 पासून वेगवेगळ्या प्रकरणात दाखल करण्यात आले आहे.
advertisement
कोणावर झालीय कारवाई?
विलास हरिभाऊ खेडकर, केशव माधव वायभट, संयोग मधुकर सोळुंके, गजानन गणपत सोळुंके, अमोल केशव पंडित, गोरख बबनराव कुरणकर, संदीप सुखदेव लोहकरे, रामदास मसूरराव तौर, वामन मसुरराव तौर आदींवर तडीपारीची कारवाई झाली आहे.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Feb 09, 2025 9:17 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या मेहुण्यासह 9 जणांवर तडिपारची कारवाई, कारण काय?








