manoj jarange patil Health update: मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक बिघडली, रुग्णालयातून पहिला PHOTO

Last Updated:

मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील प्रकृती खालावल्याने छत्रपती संभाजीनगरच्या गॅलक्सी रुग्णालयात दाखल, डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला.

News18
News18
छत्रपती संभाजीनगर, अविनाश कानडजे : महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर होत असतानाच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गेल्या काही दिवसांपासून सततचे दौरे आणि दगदगीमुळे त्यांना शारीरिक थकवा जाणवत होता, मात्र आज ताप भरल्याने त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज भासली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील यांना गेल्या काही तासांपासून तीव्र ताप येत होता. आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर सुरू असलेले दौरे, सभा आणि आंदोलनांच्या नियोजनामुळे त्यांच्या शरीरावर मोठा ताण आला होता. प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने गॅलक्सी रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. सध्या डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांच्यावर उपचार करत असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
advertisement
जरांगे पाटील रुग्णालयात दाखल झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच, छत्रपती संभाजीनगरमधील मराठा समाज बांधव आणि त्यांच्या समर्थकांनी गॅलक्सी रुग्णालयाबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला असून, सध्या कोणालाही भेटण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. यापूर्वीही उपोषण आणि आंदोलनांदरम्यान जरांगे पाटील यांची प्रकृती अनेकदा बिघडली होती. त्यावेळीही डॉक्टरांनी त्यांना दीर्घकाळ विश्रांती घेण्याचे आवाहन केले होते.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
manoj jarange patil Health update: मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक बिघडली, रुग्णालयातून पहिला PHOTO
Next Article
advertisement
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement