Manoj Jarange Patil: हत्येचा कट रचणारे ते 2 नेते कोण? मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
- Published by:Sachin S
Last Updated:
'हे सत्य आहे, कट शिजला गेला आहे. हत्या घडवून आणणे. पोलीस या प्रकरणाचा तपास करणार आहे. दूध का दूध पाणी होईल. सध्या मी काय प्रकार आहे, ते ऐकतोय.
जालना: मराठा आंदोलनासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांना जीवे मारण्याची धमकी आणि जीवे मारण्याचा कट रचण्याच्या प्रयत्नात असणाऱ्याा दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे मराठवाड्यात खळबळ उडाली आहे. "ज्यांनी कुणी हे केलं त्याने चुकीच्या ठिकाणी हात घातला आहे. असे बाटगे आम्ही लय पाहिले. तू लय चूक केली. कारण मी, करून घेणारा म्हणतोय. हे चुकीचं पाऊल तू उचलायचा नको होतं. करण्यापेक्षा करून घेणारा खरगाटे XXX ला आम्ही मराठे अजिबात गिनीत नाही. तू पुढे ध्यानात ठेवं' असं म्हणत मनोज जरांगेंनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या दोघांना जालना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतलेल्या दोघांची नाव कळू शकलेली नाही. मात्र दोन जण जरांगे यांना जीवे मारण्याचा कट रचत असल्याची तक्रार जालना पोलिसांकडे बीडच्या काही कार्यकर्त्यांनी केली होती. या तक्रारीवरून जालना गुन्हे शोध पथकाने दोघांना ताब्यात घेतलं असून सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणावर मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली.
advertisement
'खरगाटे, $#% ला आम्ही मराठे अजिबात गिनीत नाही'
'हे सत्य आहे, कट शिजला गेला आहे. हत्या घडवून आणणे. पोलीस या प्रकरणाचा तपास करणार आहे. दूध का दूध पाणी होईल. सध्या मी काय प्रकार आहे, ते ऐकतोय. काही रेकॉर्डिंग आहे, ते ऐकतो. त्यानंतर उद्या सकाळी ११ वाजता सविस्तर बोलेन. पण, ज्यांनी कुणी हे केलं त्याने चुकीच्या ठिकाणी हात घातला आहे. असे बाटगे आम्ही लय पाहिले. तू लय चूक केली. कारण मी, करून घेणारा म्हणतोय. हे चुकीचं पाऊल तू उचलायचा नको होतं. करण्यापेक्षा करून घेणाऱ्या खरगाटे, $#% ला आम्ही मराठे अजिबात गिनीत नाही. तू पुढे ध्यानात ठेवं' अशी प्रतिक्रिया जरांगेंनी दिली.
advertisement
"मराठा बांधवांना आवाहन करतोय. मी एकदम चांगला आहे. अंतरावलीमध्ये लोकांनी गर्दी केली आहे. यांची पाठ पुराव्याला मी खंबीर आहे. अंतिम लढायला आले तर जेला ठेवायची वेळ आली तरी मागे हटणार नाही. या टोळीचं गँगवार सुरू आहे, ते काही मला माहिती नाही. हे भेदून आतली माहिती आम्ही बाहेर काढली, मग आम्हीही काही कच्चे नाही. आम्ही काही कमी नाही. मराठा बांधवांनी शांतता राखावी. मी रक्त सांडण्याची वेळ आली तर मी मरण्याला घाबरत नाही, असं आवाहनही जरांगेंनी केलं.
advertisement
ते २ नेते कोण?
view comments'आता ते दोन नेते कोण आहे. ते समोर येईल. आमचे जालन्याचे एसपी साहेब, तपास करत आहे. देवेंद्र फडणवीस साहेब नेहमी हे ना ते आदेश देतात. आता चौकशीचे आदेश देतील. आता ते खोलात तपास करतील का, किती दखल घेतील हे सगळं मराठा समाज पाहत आहे. हे जे काही गंभीर आहे, पण आम्ही खंबीर आहे. हे ज्यांनी कुणी केलंय त्याने खूप मोठी चूक केली आहे, आता मी उद्या पत्रकार परिषदेत सविस्तर बोलणार आहे. पुराव्यासह सांगणार आहे. शत्रूच्या छावण्या कशा उधळायच्या हे आम्हाला चांगलं माहित आहे. हा नेता लय चिल्लर आहे, त्याला मी गिनतही नाही. आता त्याने कुठे हात घातला हे त्याला कळेल' असंही मनोज जरांगेंनी सांगितलं.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
November 06, 2025 5:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Manoj Jarange Patil: हत्येचा कट रचणारे ते 2 नेते कोण? मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...


