राजरत्न आंबेडकरांचा सनसनाटी आरोप, मित्रपक्षाच्या यादीवर मनोज जरांगे काय बोलले?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
राजरत्न आंबेडकर यांनी जरांगेंचा दावा खोडून काढत, आपण करत जरांगे यांना उमेदवारांची यादी आधीच दिल्याचे म्हटले होते. पत्रकारांनी या विषयावर प्रश्न विचारला असता, राजरत्नचा विषय संपलेला असे म्हणत बोलण टाळलं आहे.
जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. एका समाजाच्या बळावर निवडणूक लढवता येणार नाही आणि मित्रपक्षांची यादीच आली नसल्याचा दावा करत जरांगेंनी माघार घेतली होती. मात्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राजरत्न आंबेडकर यांनी हा दावा खोडून काढत, आम्ही यादी दिल्याची माहिती दिली होती.त्यामुळे राजरत्न आंबेडकरांच्या या दाव्यावर आता जरांने नेमकं काय बोललेत हे जाणून घेऊयात.
राजरत्न आंबेडकर यांनी जरांगेंचा दावा खोडून काढत, आपण करत जरांगे यांना उमेदवारांची यादी आधीच दिल्याचे म्हटले होते. पत्रकारांनी या विषयावर प्रश्न विचारला असता, राजरत्नचा विषय संपलेला असे म्हणत बोलण टाळलं आहे.
राज ठाकरेंना ठणकावलं
उपोषणावेळी आरक्षण मिळू शकत नाही असं जरांगे यांची भेट घेऊन राज ठाकरेंनी सांगितलं होतं असं जाहीर भाषणात राज ठाकरेंनी उल्लेख केला होता. त्यावर जरांगे यांनी राज ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतलाय. आमचा वर्ग तुम्हाला मानणारा आहे. मात्र तुम्ही आरक्षणावर काही बोलू नये. समाजाचं अस्तित्व आणि आरक्षण कसं मिळवायचं ते मी पाहतो. तुमच्यासारखं अस्तित्व गमावून बसणारा मी नाही. त्यामुळं तुम्ही या भानगडीत पडू नका असा इशारा जरांगे यांनी दिला आहे..
advertisement
विधानसभा निवडणुकीत मराठा समाज योग्य भूमिका घेईल असं सांगत येणाऱ्या १० तारखेला मी माझी भूमिका स्पष्ट करणार असल्याचं जरांगे यांनी म्हंटलं आहे. शिवाय शेवटच्या दोन दिवसातही मराठा समाज कार्यक्रम लावू शकतो असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.
view commentsLocation :
Jalna,Maharashtra
First Published :
Nov 07, 2024 6:58 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राजरत्न आंबेडकरांचा सनसनाटी आरोप, मित्रपक्षाच्या यादीवर मनोज जरांगे काय बोलले?