फडणवीसांवर राग का? जरांगेंनी काय सांगितलं? असिम सरोदेंनी केला गौप्यस्फोट
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी निर्भय बनो च्या सभेचं आयोजन बारामतीमध्ये करण्यात आलं होतं. या सभेत बोलताना असीम सरोदे यांनी मनोज जरांगे पाटलांबाबत गौप्यस्फोट केले आहेत.
बारामती : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी निर्भय बनो च्या सभेचं आयोजन बारामतीमध्ये करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला विश्वंभर चौधरी, असीम सरोदे यांच्यासह शरद पवारांच्या भगिनी आणि एनडी पाटील यांच्यात पत्नी सरोज पाटील, शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार उपस्थित होत्या. या कार्यक्रमात बोलताना असीम सरोदे यांनी जरांगे पाटील यांच्याबाबत गौप्यस्फोट केले आहेत. मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार द्यायच्या तयारीत होते, पण त्यांनी माघार का घेतली? याचं कारण असीम सरोदे यांनी सांगितलं आहे.
काय म्हणाले असीम सरोदे?
'मी जरांगे पाटील यांच्याशी बोलायचो भेटायचो. विधानसभा ला जरांगे पाटील उमेदवार देणार होते, मी त्यांच्याकडे गेलो. जरांगे पाटील यांनी उमेदवार उभे केले नाहीत. देवेंद्र फडणवीस यांना वाटत होतं जरांगे यांनी उमेदवार उभे करावेत, कारण मताचे विभाजन होईल. जरांगे म्हणाले माझा राग फडणवीस यांच्यावर आहे', असं वक्तव्य असीम सरोदे यांनी केलं आहे.
advertisement
जरांगेंनी फडणवीसांवर रागाचं कारणही सांगितलं होतं. अंतरवालीत आंदोलकांवर लाठीचार्ज केला गेला होता. त्यामुळे फडणवीसांवर राग असल्याचं जरांगे तेव्हा म्हणाले होते असं असीम सरोदे यांनी सांगितलं.
Location :
Baramati,Pune,Maharashtra
First Published :
Nov 15, 2024 10:33 PM IST










