Mumbra Marathi Youth : मराठी येत नाही का? तरुणाने विचारलं अन् जमावानं घेरलं, मागायला लावली माफी, पाहा व्हिडीओ
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Marathi Youth Mumbra : मराठीत संवाद साधण्याचा आग्रह धरणाऱ्या तरुणाला फेरीवाल्यांनी घेराव घालत कान पकडून माफी मागण्यास भाग पाडले असल्याची घटना समोर आली आहे.धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी मराठी तरुणावरच गुन्हा दाखल केला आहे.
ठाणे : मागील काही दिवसांपासून मराठी-बिगर मराठी असा वाद मुंबईसह महाराष्ट्रात सुरू झाला आहे. महाराष्ट्रात राहूनही मराठी भाषेत संवाद साधण्यास माजुरड्या भाषेत नकार दिला जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. मराठी भाषेत संवाद साधण्याचा आग्रह धरणं मराठी तरुणाला महागात पडलं आहे. मराठीत संवाद साधण्याचा आग्रह धरणाऱ्या तरुणाला फेरीवाल्यांनी घेराव घालत कान पकडून माफी मागण्यास भाग पाडले असल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी मराठी तरुणावरच गुन्हा दाखल केला आहे. ठाण्यातील मुंब्रामध्ये ही घटना घडली.
मुंब्रामध्ये मराठी-अमराठी असा वाद उफाळून आला आहे. मुंब्रामधील घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. फळविक्रेत्याला मराठी का येत नाही विचारले म्हणून जमावाने तरुणाला कान पकडून माफी मागायला लावली. यावेळी बिगर मराठी जमावाने मराठी तरुणाला शिविगाळ केली. मराठी तरुणावरच मुंब्रा पोलिसांनी गु्न्हा दाखल केला आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व प्रशासनाने महाराष्ट्राची केलेली गत#ठाणे @ThaneCityPolice#मुंब्रा मराठीची मागणी केली म्हणून तेथील परप्रांतीयांनी जमाव करून मराठी मुलाला मारहाण करून माफी मागायला लावली, पोलिसांनी या मुलालाच ठाण्यात घेऊन गेले.
आणखीन किती घटना?
हे मराठी राज्यात घडतंय. pic.twitter.com/SUwhdBqAjk
— मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti (@ekikaranmarathi) January 2, 2025
advertisement
प्रकरण काय?
मराठी तरुण विशाल गवळी मुंब्रामध्ये फळ खरेदी करण्यास गेला होता. त्यावेळी या विशाल गवळीने फळ विक्रेत्याला मराठीत बोलण्यास सांगितले. त्यावरुन वाद झाला. मला मराठी येत नाही मी हिंदीत बोलणार असं फळ विक्रेत्याने सांगितले. त्यानंतर मराठी तरुण “महाराष्ट्रात रहायचे असेल तर मराठी आलेच पाहिजे, मी मुंब्रा बंद करुन टाकेन” असं बोलू लागला. मराठी तरुणाचा आक्रमक पवित्रा पाहिल्यानंतर इतर विक्रेते आणि स्थानिकांनी तरुणाभोवती गर्दी केली.
advertisement
मराठी येत नाही, काय करायचं ते कर...
मराठीचा आग्रह धरणाऱ्या तरुणाला बिगर मराठी जमावाने घेरले. मुंब्रामध्ये मराठी-हिंदी वाद का करतो, मुंब्रा शांत आहे शांत राहू दे असे स्थानिक बोलू लागले. गर्दी वाढल्याने वाद चिघळला.आम्हाला मराठी येत नाही काय करायचे ते कर असं गर्दीतले लोकं बोलत होते. हिंदी येते तर हिंदीत बोल वाद कशाला करतो असं बोलून मराठी तरुणाला पोलीस स्टेशनला नेले. पोलिसांनी स्थानिकांच्या तक्रारीवर मराठी तरुणावरच गु्न्हा दाखल केला आहे. ही घटना मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
January 03, 2025 8:12 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbra Marathi Youth : मराठी येत नाही का? तरुणाने विचारलं अन् जमावानं घेरलं, मागायला लावली माफी, पाहा व्हिडीओ