Maratha Reservation : भगवं वादळ 'राजधानी'वर धडकणार, जरांगेंच्या मुंबई दौऱ्याची टाईमलाईन ठरली!

Last Updated:

मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली ते मुंबई दौऱ्यासंदर्भातील टाईमलाईन सांगितली आहे. अंतरवाली ते मुंबई दरम्यान 6 ठिकाणी मुक्काम असेल.

भगवं वादळ 'राजधानी'वर धडकणार, जरांगेंच्या मुंबई दौऱ्याची टाईमलाईन ठरली!
भगवं वादळ 'राजधानी'वर धडकणार, जरांगेंच्या मुंबई दौऱ्याची टाईमलाईन ठरली!
अंतरवाली सराटी : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारवर टीकेा केली आहे. अंतरवाली सराटीच्या नादी लागू नका, राजकीय जीवनात कधीच दिसणार नाहीत अशी वेळ तुमच्यावर येईल, असा इशारा जरांगेंनी सरकारला दिला आहे. यावेळी बोलतांना त्यांनी भुजबळांवरही नाव न घेता टीका केली. 26 जानेवारीला मुंबईत किती मराठे येतील हे फक्त बघा असा टोला जरांगेंनी भुजबळांना लगावला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली ते मुंबई दौऱ्यासंदर्भातील टाईमलाईनही सांगितली. अंतरवाली ते मुंबई दरम्यान 6 ठिकाणी मुक्काम असेल. दररोज साधारण 70 ते 80 किमी ही पायी रॅली असणार आहे, अशी माहितीही जरांगेंनी दिली आहे.
अंतरवाली ते मुंबई दौऱ्याची टाईमलाईन
20 जानेवारी 2024
सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटी येथून सुरुवात
भोजन थांबा: कोळगाव, ता. गेवराई
मुक्काम: मातोरी, ता. गेवराई
21 जानेवारी 2024
भोजन थांबा: तनपुरवाडी, ता. पाथर्डी
मुक्काम: बाराबाभळी, करंजी घाट
22 जानेवारी 2024
भोजन थांबा: सुपा, ता. पारनेर
मुक्काम: रांजणगाव, पुणे
23 जानेवारी 2024
भोजन थांबा: कोरेगाव भीमा, पुणे
advertisement
मुक्काम: चंदननगर, खराडी बायपास, पुणे
24 जानेवारी 2024
भोजन थांबा: देहू फाटा, पुणे
मुक्काम: लोणावळा
25 जानेवारी 2024
भोजन थांबा: पनवेल
मुक्काम: वाशी
26 जानेवारी 2024
थांबा: आंदोलनाचे ठिकाण, आझाद मैदान किंवा छत्रपती शिवाजी पार्क, मुंबई
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maratha Reservation : भगवं वादळ 'राजधानी'वर धडकणार, जरांगेंच्या मुंबई दौऱ्याची टाईमलाईन ठरली!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement