बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात दोन अधिकाऱ्यांचे निलंबन, मंत्री संजय शिरसाट यांचा मोठा निर्णय
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
विधान परिषद सदस्य राजेश राठोड यांनी बुलढाणा जिल्ह्यात विमुक्त जाती (अ) प्रवर्गातील बोगस जात वैधता प्रमाणपत्रांविषयी कारवाईची लक्षवेधी सूचना मांडली.
नागपूर : बुलढाणा जिल्ह्यात विमुक्त जाती (अ) प्रवर्गातील बोगस जात वैधता प्रमाणपत्र संदर्भात आधारे मिळालेल्या चौकशीत दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात येत असल्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य राजेश राठोड यांनी बुलढाणा जिल्ह्यात विमुक्त जाती (अ) प्रवर्गातील बोगस जात वैधता प्रमाणपत्रांविषयी कारवाईची लक्षवेधी सूचना मांडली. यावर उत्तर देताना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट बोलत होते. यावेळी सदस्य सतेज पाटील आणि अॅड. अनिल परब यांनीही चर्चेत सहभाग घेतला.
सामाजिक न्याय मंत्री शिरसाट म्हणाले की, बुलढाणा जात पडताळणी समितीने 2011-12 मध्ये अनेक गंभीर त्रुटी केल्या, तपासणी न करता प्रमाणपत्रे दिल्याचे स्पष्ट दिसत आहे. बोगस जात प्रमाणपत्र विषयी शासन गंभीर असून भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी काळजी घेतली जाईल. तसेच चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
December 11, 2025 9:33 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात दोन अधिकाऱ्यांचे निलंबन, मंत्री संजय शिरसाट यांचा मोठा निर्णय










