advertisement

रोहित पवारांच्या लढ्याला यश, VSR विमान कंपनीचं दुकानं बंद, DGCA च्या अहवालात अखेर सत्य समोर

Last Updated:

राष्ट्रवादीचे आमदार आणि अजितदादांचे पुतणे रोहित पवार यांनी मुंबई आणि दिल्लीत पत्रकार परिषदा घेऊन विमान अपघाताबद्दल धक्कादायक माहिती आणि गंभीर आरोप केले होते.

News18
News18
मुंबई: राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. पण, हा अपघात आहे की घातपात आहे, याबद्दल वेगळाच संशय व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार आणि अजितदादांचे पुतणे रोहित पवार यांनी मुंबई आणि दिल्लीत पत्रकार परिषदा घेऊन विमान अपघाताबद्दल धक्कादायक माहिती आणि गंभीर आरोप केले. त्यांनी मुख्य म्हणजे, ज्या विमानाचा अपघात झाला, त्या विमानाच्या कंपनीवरही गंभीर आरोप केले होते. अखेरीस रोहित पवारांच्या या लढ्याला यश आलं आहे. VSR कंपनीच्या उड्डाणावर देशभरात बंदी करण्यात आली आहे.
अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी  नागरी विमान वाहतूक महासंचालनालय अर्थात DGCA कडून पहिली कारवाई करण्यात आली आहे. DGCA ने VSR व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या विमान कंपनीच्या उड्डाणांवर बंदी आणली आहे. DGCA  या प्रकरणी ऑडिट केलं आहे. यामध्ये  VSR व्हेंचरच्या सर्व लिअरजेट विमानांच्या उड्डाणांवर आता बंदी आणली आहे.  कंपनीच्या अनेक विमानांमध्ये त्रुटी आढळली आहे.  यामध्ये VT - VRA, VT - VRS, VT - VRV आणि VT - TRI या चार विमानांवर DGCA ने  उड्डाणासह मनाई घातली आहे.
advertisement
DGCA ने आपल्या रिपोर्टमध्ये काय म्हटलं आहे? 
बारामती इथं 28 जानेवारी रोजी झालेल्या मेसर्स व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या लिअरजेट 45 विमानाच्या (व्हीटी-एसएसके) अपघातानंतर, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने संस्थेचे विशेष सुरक्षा ऑडिट करण्याचे आदेश दिले. बहु-ऑडिट टीमने संस्थेमध्ये हवाई योग्यता, हवाई सुरक्षा आणि उड्डाण ऑपरेशन्सच्या क्षेत्रात अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत.
advertisement
निरीक्षण केलेल्या गंभीर चुका तथा त्रुटी लक्षात घेता नोंदणीकृत लिअरजेट 40/45 विमानांना तात्काळ ग्राउंडिंग करून सुधारणात्मक उपाययोजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डीजीसीएकडून पुढील मूल्यांकनासाठी गैर-अनुपालनांचे मूळ कारण विश्लेषण सादर करण्यासाठी वरील उल्लेखित क्षेत्रांमध्ये मेसर्स व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडला कमतरता अहवाल फॉर्म जारी करण्यात आले आहेत.
advertisement
रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले होते गंभीर आरोप
रोहित पवार यांनी मुंबई, दिल्लीमध्ये पत्रकार परिषदा घेऊन अजितदादांच्या विमानाचा अपघात नसून घातपात असल्याचा दावा केला होता. तसंच  रोहित पवार यांनी VSR या विमान कंपनीवर अनेक आरोप केले होते. खास करून या कंपनीला राजकीय संरक्षण दिले जात असल्याचा आरोपही केला होता. ज्या दिवशी अपघात घडला तेव्हा विमानाचा ट्रान्सपॉन्डर शेवटच्या काही मिनिटांत बंद झाला होता. या कंपनीने खर्च वाचवण्यासाठी विमानात बेकायदेशीररीत्या जास्तीच्या इंधन टाक्या ठेवल्या गेल्या होत्या, ज्यामुळे अपघातानंतर मोठा स्फोट झाला, असा दावा त्यांनी केला.
advertisement
विमानात अपघात का झाला?
१) विमानात काय बिघाड झाला होता? machanical failure झालं का?
2)विमान हे स्टॉल झालं, टेकऑफच्या आधी विमानाची एक मेकिनिकल टीमकडून तपासणी केली जात असते. टेकऑफ पूर्वी विमानाचं चेकअप करावं लागतं. चेकअप झालं होतं, चेकअप करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी लागणार आहे.
3) टेकलॉग कुठे आहे. विमानाचा airworthy report कुठे आहे?
advertisement
4) विमानाचा रुटीन लाईन मेटेंन्स झाला नव्हता का? कुणी केला होता? hanger मधील सीसीटीव्ही फुटेज कुठे आहेत
5) विमानाचा हेव्ही बेस मेटेंन्स कधी झालं होतं का? त्याचा रिपोर्ट कुठे आहे?
कंपनीचा इतिहास काय?
कंपनीचा याच विमानाचा १४ सप्टेंबर २०२३ मध्ये अपघात झाला होता, विमान हे Learjet 45 XR होतं, मुसळधार पावसामुळे विमानाचा मुंबईत विमानतळावर अपघात झाला. या अपघातात ६ प्रवाशी गंभीर जखमी झाले होते.
advertisement
मुंबई विमानतळावर ILS system आहे तरी घसरलं, या विमानाच्या अपघाताची चौकशी होऊन अहवाल येणे गरजेचं होतं, पण याचा अहवाल कधीच आला नाही. आतापर्यंत या विमानाचा अहवाल आला नाही. २ वर्ष झाले तरी अहवाल दाबण्यात आला. का हा अहवाल दाबण्यात आला. जर हा अहवाल समोर आला असता तर काही बदल झाले असते. जर हा अहवाल समोर आला असता तर अजितदादा आपल्यात असते. हा रिपोर्ट दाबला हा आमचा आरोप आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर काय चर्चा झाली, २०२३ ला अपघात झाल्यानंतर आपल्या देशात कारवाई झाली नाही. EASA ने गंभीर दखल घेतली . EASA ने vsr ला विचारलं, अपघाताची माहिती देण्याचं सांगितलं. पण VSR कंपनीने कोणतीही कागदपत्र दिली नाही. EASA कडून VSR चा TCO third country operator परवाना स्थगिती करण्यात आली होती.
लेव्हल १ ची त्रुटी असल्याचे कारण देत EASA कडून VSR चा परवाना रद्द करण्यात आला होता. सुरक्षेचा गंभीर शेरा दिला होता. युरोपीय एजन्सीने VSR कंपनीच्या विमानाच्या सगळ्या परवानग्या काढून घेतल्या. पण भारतात अजूनही VSR कडून विमान प्रवास सुरू आहे. आमचा काका विमान अपघातात गेला, आता मुख्यमंत्र्यांसह इतर नेत्यांच्या या विमानातून प्रवास होतो, मग VSR ला परवानगी कोण देतं.
VSR च्या बाबतीतल्या पुढे आलेल्या गंभीर बाबी :
१) Flight Duty Time Limitation (FDTL) नियमांचे उल्लंघन -- कागदपत्रांवर वैमानिकांच्या उड्डाणाच्या तासांमध्ये फेरफार केला जातो.
२) Cockpit Voice Recorders (CVR) - सर्व संभाषणं आणि आवाज रेकॉर्ड करणारे विमानाचे CVR वारंवार बंद असतात.
३) Checklist/Techlog विमान आणि दरम्यान पाळली जाणारी Checklist वापरण्याची पद्धत कंपनीमध्ये नसल्याची माहिती समोर आली आहे.
४) Standard Operating Procedure (SOP) - स्वतःची SOP नाही, उत्पादक कंपनीच्या SOP चे पालन केले जात नाही.
५) VSR कडून Cost cutting वर भर असल्याने विमानाची देखभाल आणि Maintenance कडे दुर्लक्ष केलं जातं.
विमानातील स्टॉल वॉर्निंग सिस्टिम बंद होती
दादा प्रवास करत असलेल्या विमानात Stall warning system नव्हती याची पक्की माहिती आहे. काही जणांनीही नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे.
Stall warning system शिवाय विमान उडवलेच कसे जात होती? Stall warning system नव्हती ही बाब Heavy (base)
Maintenance मध्ये समोर आली नव्हती का?
(PTT) Push To Talk बटन चालू, त्यामध्ये Stall Warning System चा कोणताही आवाज का Record झाला नाही.
Stall Warning नसल्याचे TECH LOG मध्ये आले होते का?
विमान अत्यंत खाली उडत होतं. विमान एक आवाज देत असतं, वॉर्निंग देत असतं लँडिंग करताना. EGPWS इशारा दिला होता की नाही, PUSH to talk सुरू होते, संपूर्ण संभाषण ATC मध्ये ऐकलं जात होतं, ही सिस्टिम बंद होती.
या विमानाची Heavy (Base) Maintenance योग्य पद्धतीने केला जात नाही.
MRO (Maintenance, Repair, and Overhaul) कडे न पाठवता Inhouse केला जातो.
कंपनीला स्वतःच Heavy (Base) maintenance करता येते का? त्यांच्याकडे तसे अधिकार आहेत का?
Heavy (Base) maintenance करणारे कर्मचारी कोण? आधी कुठल्या कंपनीत काम करत होते?
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
रोहित पवारांच्या लढ्याला यश, VSR विमान कंपनीचं दुकानं बंद, DGCA च्या अहवालात अखेर सत्य समोर
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement