स्वतःचे दोन प्लॉट विकून आमदार संजय गायकवाड यांच्याकडून पूरग्रस्तांना २५ लाखांची मदत

Last Updated:

Sanjay Gaikwad: आपले स्वतः चे दोन प्लॉट विकून पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय आमदार संजय गायकवाड यांनी घेतला. २५ लाखांच्या रकमेसह त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

संजय गायकवाड (आमदार)
संजय गायकवाड (आमदार)
राहुल खंडारे, प्रतिनिधी, बुलढाणा : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी कधी नव्हे ते संवेदनशील पाऊल उचलले आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्वतःचे दोन प्लॉट विकले आहे. संजय गायकवाड यांनी पूरग्रस्तांना जवळपास पंचवीस लाखाची रोख मदत केली आहे.
यंदाच्या पावसाने मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांवर आभाळ कोसळले आहे. शेतजमीन खरडून गेली, पिकांचे मोठे नुकसान झाले. पशुधन वाहून गेले. शेतात मातीही उरली नाही. अशा स्थितीत मदतीचे हात पुढे येत आहेत.
बुलढाणा येथील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी स्वतःचे मालकीचे दोन प्लॉट विकून नुकसानग्रस्तांना पंचवीस लाखाची मदत देत असल्याचे घोषित केले आहे. यावेळी त्यांच्या दोन प्लॉटच्या विक्रीचे सौदा झाल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. पंचवीस लाखाची रक्कम देखील त्यांनी पत्रकार परिषदेत आणली होती. ही रक्कम मुंबईला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ते देणार आहेत.
advertisement
बुलढाणा मतदारसंघात मोताळा तालुक्यातील खामखेड, गुळभेली, राहेरा, नळकुंड, दाभा, तांडा, उबाळखेड, रोहिणखेड, खेडी, पान्हेरा, कोऱ्हाळा बाजार तसेच बुलढाणा तालुक्यातील गिरडा, चौथा, पाडळी यासह अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मोठया प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. ही सर्व गावे आमदार संजय गायकवाड यांच्या मतदान संघातील आहेत. त्यामुळे आपले स्वतः चे दोन प्लॉट विकून पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय आमदार संजय गायकवाड यांनी घेतला. २५ लाखांच्या रकमेसह त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
advertisement

कोण आहेत संजय गायकवाड?

-संजय गायकवाड हे शिवसेना पक्षाचे बुलढाणा मतदारसंघाचे आमदार आहेत
-उद्धव ठाकरे सरकारमध्ये ते शांत होते परंतु एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ते प्रकाशझोतात आले
-सतत वादग्रस्त वक्तव्य करणारे आमदार
-आमदार संजय गायकवाड हे नाव ऐकताच वाद, दमबाजी, कमरेखालची टीका, तोल सुटला हे शब्द समोर येतात
मुंबईत आमदार निवासातील कँटीनमधल्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करून ते देशात चर्चेच्या केंद्रस्थानी होते.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
स्वतःचे दोन प्लॉट विकून आमदार संजय गायकवाड यांच्याकडून पूरग्रस्तांना २५ लाखांची मदत
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement