MNS: मतमोजणीत हायव्होल्टेज ड्रामा! चौथ्या फेरीपर्यंत मनसेचा गुलाल तयार होता, पण शेवटच्या फेरीत नियतीने 'गेम' फिरवला,
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
MNS BMC Election Reults: राज ठाकरेंच्या मनसेचा शिलेदार मतमोजणीच्या चौथ्या फेरीपर्यंत आघाडीवर होता. मात्र, शेवटच्या फेरीत मनसेच्या शिलेदाराला पराभवाचा धक्का बसला.
मुंबई: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाले आहेत. तर, दुसरीकडे मतमोजणीत सुरू असलेल्या उलटफेरामुळे काही प्रभागात धक्कादायक निकाल दिसून आले. राज ठाकरेंच्या मनसेचा शिलेदार मतमोजणीच्या चौथ्या फेरीपर्यंत आघाडीवर होता. मात्र, शेवटच्या फेरीत मनसेच्या शिलेदाराला पराभवाचा धक्का बसला. अवघ्या १६४ मतांनी मनसेचा पराभव झाला.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या सर्वात चुरशीच्या लढतींपैकी एक असलेल्या मुलुंड पूर्व (प्रभाग १०६) मध्ये भाजपने आपले वर्चस्व राखले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी गट नेते प्रभाकर शिंदे यांनी मनसेच्या सत्यवान दळवी यांच्यावर अवघ्या १६४ मतांच्या फरकाने निसटता विजय मिळवला. या विजयामुळे शिंदे आता पाचव्यांदा नगरसेवक म्हणून महापालिकेत पाऊल ठेवणार आहेत.
advertisement
शेवटच्या फेरीत बाजी पलटली!
या प्रभागातील मतमोजणी सुरुवातीपासूनच श्वास रोखून धरायला लावणारी होती. पहिल्या फेरीपासून मनसेच्या सत्यवान दळवी यांनी मोठी आघाडी घेतली होती. पहिल्या फेरीत दळवी ४,१११ मतांनी पुढे होते. तिसऱ्या फेरीच्या अखेरीस दळवी यांना ११,१८६ मते मिळाली होती, तर प्रभाकर शिंदे १०,९४० मतांसह पिछाडीवर होते.
प्रियदर्शिनी क्रीडा संकुलाबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला होता आणि दळवींचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, चौथ्या आणि शेवटच्या फेरीत प्रभाकर शिंदे यांनी मुसंडी मारली. शिंदेंनी एकूण ११,८९७ मते मिळवून दळवींच्या तोंडचा घास हिरावून घेतला.
advertisement
पाचवा कार्यकाळ आणि महापौरपदाची चर्चा
प्रभाकर शिंदे हे मुंबई महापालिकेतील अनुभवी नगरसेवक आहेत. १९९७, २००२, २००७ आणि २०१७ नंतर आता २०२६ मध्ये त्यांनी पाचव्यांदा विजय मिळवला आहे. त्यांची प्रशासकीय कामावरील पकड आणि अनुभव पाहता, भाजपच्या गोटात त्यांना महापौरपदाचे प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात आहे. २०१७ मध्ये शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी मुलुंडमध्ये स्वतःचे स्थान अधिक भक्कम केले आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 11:16 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
MNS: मतमोजणीत हायव्होल्टेज ड्रामा! चौथ्या फेरीपर्यंत मनसेचा गुलाल तयार होता, पण शेवटच्या फेरीत नियतीने 'गेम' फिरवला,










