तावातावात गेला अन् टॉयलेटमध्ये टाकली लाखोंची रक्कम, बुलढाण्यात तहसिलदाराचा विचित्र कांड

Last Updated:

बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील तहसीलदार हेमंत पाटील याला दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली आहे.

AI Generated Photo
AI Generated Photo
बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील तहसीलदार हेमंत पाटील याला दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली आहे. विशेष म्हणजे, कारवाईची कुणकुण लागताच आरोपी तहसीलदाराने लाचेची रक्कम शौचालयात टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, मात्र एसीबीने तत्काळ कारवाई करत ही रक्कम जप्त केली. ही कारवाई रविवार, १४ सप्टेंबर रोजी बुलढाणा येथील तहसीलदाराच्या निवासस्थानी करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मोताळा तालुक्यातील थड येथील एका शेतकऱ्याला त्यांच्या गट क्रमांक २३ मधील १.६२ हेक्टर शेतजमीन त्यांच्या भाच्याला विकायची होती. या व्यवहारासाठी सौदेपत्रक तयार करण्यात आले होते. ही जमीन भोगवटादार वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याची गरज होती, जेणेकरून विक्रीची प्रक्रिया पूर्ण होऊ शकेल.
शेतकरी अशिक्षित असल्यामुळे त्यांचा भाचा या कामासाठी तहसीलदार हेमंत पाटील याला भेटला. याच संधीचा फायदा घेत भामट्या तहसिलदाराने या कामासाठी प्रति एकर ५० हजार रुपये याप्रमाणे एकूण दोन लाख रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अकोला यांच्याकडे तक्रार दाखल केली.
advertisement
तक्रारीची गंभीर दखल घेत एसीबीने १३ सप्टेंबर रोजी या तक्रारीची पडताळणी केली आणि त्यानंतर सापळा रचण्याचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे, रविवार, १४ सप्टेंबर रोजी दुपारी तक्रारदाराने तहसीलदार पाटील यांना त्यांच्या निवासस्थानी दोन लाख रुपये दिले. जसे ही रक्कम पाटील यांनी स्वीकारली, त्याच क्षणी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. एसीबीच्या पथकाची चाहूल लागताच पाटील यांनी लगेच ती रक्कम शौचालयात फेकून दिली, परंतु एसीबीने ती तत्काळ हस्तगत केली. लाचखोर हेमंत पाटील विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तावातावात गेला अन् टॉयलेटमध्ये टाकली लाखोंची रक्कम, बुलढाण्यात तहसिलदाराचा विचित्र कांड
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement