MPSC Examination 2025 Date: ‘एमपीएससी’ परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर! परीक्षा कधी होणार? जाणून घ्या एका क्लिकवर
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
MPSC Examination 2025 Latest News: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरिक्षेचं नवीन सुधारित वेळापत्रक जाही करण्यात आलं आहे.
गेल्या महिन्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये झालेल्या पूर परिस्थितीमुळे एमपीएससीला त्यांची परीक्षा पुढे ढकलावी लागली होती. आता अखेर त्या परिक्षेची तारीख समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरिक्षेचं नवीन सुधारित वेळापत्रक जाही करण्यात आलं आहे. राज्यातल्या पूर परिस्थितीमुळे, अनेक वेगवेगळ्या बोर्डांना त्यांच्या त्यांच्या विविध परीक्षांचे वेळापत्रकामध्ये बदल करावे लागले होते.
नुकतेच, एमपीएससीने अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करून परिक्षेच्या तारखेची माहिती अर्जदारांना सांगितली आहे. दरवर्षी, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये येणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचं अंदाजित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. सुधारित परिक्षांच्या नवीन वेळापत्रकानुसार, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा 9 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे. तर, महाराष्ट्र गट- ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 21 डिसेंबर 2025 होणार आहे, महाराष्ट्र गट- क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२५ ही ४ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे.
advertisement
2025 साली होणार्या दिवाणी न्यायधीश कनिष्ठ स्तर आणि न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षांची जाहिरात शासनाच्या सूचनेनुसार स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे या परीक्षांसाठी नवीन वेळापत्रक तयार केले जाणार आहे.
Location :
Maharashtra
First Published :
October 11, 2025 8:44 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
MPSC Examination 2025 Date: ‘एमपीएससी’ परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर! परीक्षा कधी होणार? जाणून घ्या एका क्लिकवर