MPSC ची परीक्षा पुढे ढकलली, आयोगाचा मोठा निर्णय, नवे वेळापत्रकही जाहीर
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
MPSC Exam Postpone: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ च्या परीक्षेचे आयोजन दिनांक २१ डिसेंबर, २०२५ रोजी सकाळी ११.०० ते १२.०० या कालावधीत करण्यात आले होते.
मुंबई : एमपीएससीची २१ डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली जाणार की नियोजित वेळेत होणार, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. अखेर आयोगाने परिपत्रक काढून परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचे निकाल २१ डिसेंबर रोजी आहेत. त्यामुळे एमपीएससीची पूर्व परीक्षा त्या दिवशी होणार की नाही? याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता. परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी एमपीएससीच्या उमेदवारांकडून करण्यात येत होती. अखेर आयोगाने निर्णय घेऊन परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर केल्या आहेत.
४ जानेवारी आणि ११ जानेवारी २०२६ ला परीक्षा होणार
advertisement
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ सुधारित दिनांकास म्हणजेच अनुक्रमे दिनांक ४ जानेवारी २०२६ व दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
परीक्षा होणार की नाही, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता. आयोगाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी आमची मागणी होती. अखेर २१ डिसेंबरला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, असे स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनचा अध्यक्ष महेश घरबुडे याने सांगितले.
advertisement
आयोगाने निर्णय घेताना काय म्हटले आहे?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ च्या परीक्षेचे आयोजन दिनांक २१ डिसेंबर, २०२५ रोजी सकाळी ११.०० ते १२.०० या कालावधीत करण्यात आले होते. तथापि, राज्यातील नगर परिषद व नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका २०२५ कार्यक्रमांतर्गत राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक ०२ डिसेंबर, २०२५ रोजीच्या आदेशानुसार मतमोजणी दिनांक २१ डिसेंबर, २०२५ रोजी करण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांना निर्देशित केले आहे. आयोगामार्फत आयोजित परीक्षा व मतमोजणी एकाच दिवशी म्हणजेच दिनांक २१ डिसेंबर, २०२५ रोजी असल्याने त्यासंदर्भात काही मुद्यांच्या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांकडून माहिती मागविण्यात आली होती.
advertisement
आयोगाने उपरोक्तप्रमाणे मागविलेल्या माहितीच्या अनुषंगाने काही जिल्हा केंद्रावरील परीक्षा उपकेंद्र व मतमोजणीचे ठिकाण यामधील कमी अंतर, लाऊडस्पीकरचा आवाज, वाहतूक कोंडी, परीक्षेदरम्यान निघणाऱ्या विजयी उमेदवारांच्या मिरवणुका, तसेच परीक्षेच्या आयोजनाकरीता कर्मचाऱ्यांची कमतरता इत्यादी बाबी विचारात घेवून त्यांनी परीक्षा आयोजित करण्यास अडचणी उद्भवू शकतात असे कळविले आहे. सदर वस्तुस्थिती विचारात घेता प्रस्तुत परीक्षा नियोजित तारखेस न घेता पुढे ढकलण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे. सदर निर्णयानुसार ४ जानेवारी २०२६ आणि दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 08, 2025 2:52 PM IST


