Mumbai Local: लवकरच धावणार अंडरग्राऊंड लोकल! कसा आहे रेल्वेचा मेगाप्लॅन?

Last Updated:

Mumbai Local: मुंबईतील उपनगरीय रेल्वे (लोकल) अंडरग्राऊंड करण्याचा विचार केला जात आहे.

Mumbai Local: लवकरच धावणार अंडरग्राऊंड लोकल! कसा आहे रेल्वेचा मेगाप्लॅन?
Mumbai Local: लवकरच धावणार अंडरग्राऊंड लोकल! कसा आहे रेल्वेचा मेगाप्लॅन?
मुंबई: महानगरी मुंबईत दररोज लाखो प्रवासी लोकल ट्रेनने प्रवास करतात. दररोज सकाळी लोकल ट्रेनच्या माध्यमातून उपनगरांतील चाकरमान्यांचे लोंढे मुंबईत दाखल होतात. त्यामुळेच लोकलला मुंबईकरांची लाईफलाईन म्हटलं जातं. गेल्या कित्येक वर्षांपासून लोकल प्रवाशांचा भार सहन करत आहे. काळाच्या ओघात लोकलच्या डब्यांमध्ये वाढ झाली, काही एसी लोकल देखील आल्या. मात्र, लोकल मार्गांमध्ये विशेष बदल झाले नव्हते. आता लवकरच जमिनीवरून धावणारी लोकल जमिनीखालून धावताना दिसणार आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमआरव्हीसी) मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या सहकार्याने दक्षिण मुंबईतील उपनगरीय रेल्वे अंडरग्राऊंड करण्याचा विचार केला आहे. एमआरव्हीसीने पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट-मुंबई सेंट्रल सेक्शन आणि मुंबई सेंट्रल जवळील मार्ग भूमिगत करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
advertisement
दक्षिण मुंबईतील प्रस्तावित भुयारी कॉरिडॉर पूर्णपणे रेल्वेच्या मालकीच्या जमिनीखाली बांधण्याची योजना आहे. या भूमिगत लोकल ट्रेनच्या संदर्भात करण्यात येणाऱ्या अभ्यासात भायखळा येथे एक प्रमुख इंटरचेंज हब विकसित करण्याच्या शक्यतेचा देखील समावेश आहे. ही शक्यता प्रत्यक्षात आल्यास शहराच्या वाहतूक कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढेल.
याशिवाय, मध्य रेल्वेच्या सीएसएमटी आणि परळ स्टेशनदरम्यान दोन अतिरिक्त उपनगरीय मार्गांचं बांधकाम करण्याचा अभ्यास देखील करण्यात आला आहे. जर हा प्रकल्प अंमलात आणला गेला तर लाखो प्रवाशांच्या प्रवासाच्या पद्धतीत बदल घडेल. लोकल ट्रेन भुयारी मार्गाने गेली तर कित्येक एकर जमीन अतिरिक्त वापरासाठी मोकळी होईल.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai Local: लवकरच धावणार अंडरग्राऊंड लोकल! कसा आहे रेल्वेचा मेगाप्लॅन?
Next Article
advertisement
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री, 'या' अभिनेत्यासाठी वेडी
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री असं का म्हणाली?
    View All
    advertisement